Goa Drowning Death: सहलीचा आनंद अल्पकाळ टिकला, म्हादईत 21 वर्षीय तरुण बुडाला, दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांवर काळाचा घाला

21 year old youth drowns in Mhadei river: भिरोंडा-सत्तरी येथील म्हादई नदीमध्ये रविवारी संध्याकाळी सहलीसाठी आलेल्या २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Goa Drowning Death
Goa Drowning DeathDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई/ मडगाव: भिरोंडा-सत्तरी येथील म्हादई नदीमध्ये रविवारी संध्याकाळी सहलीसाठी आलेल्या २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव रजत काणकोणकर (वय २१ वर्षे, रा. गोवा वेल्हा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहलीसाठी आलेल्या तरुणांचा एक गट दुपारी जेवणानंतर पुन्हा नदीत उतरला होता. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास रजत पोहत असतानाच अचानक बुडू लागला. स्थानिकांनी त्याला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला.

Goa Drowning Death
Tourist deaths in Goa: राज्यात पर्यटकांच्या मृत्यूंनी वाढली चिंता, सव्वातीन महिन्यांत 29 प्रकरणे समोर; ड्रग्स, अपघातांसह गुन्ह्यांचे सावट

मिळालेल्या माहितीनुसार, रजत मित्रांसोबत भिरोंडा येथे सहलीसाठी आला होता. तो म्हादई नदीत आंघोळीसाठी उतरला असता अंदाज न आल्याने खोल पाण्यात खेचला गेला आणि बुडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी तातडीने अग्निशमन दलाला या प्रकाराची माहिती दिली.

वाळपई अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले. दलाचे अधिकारी श्रीकृष्ण नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकात महादेव गावडे, आनंद शेटकर आणि आदित्य गावस यांनी शोधमोहीम राबवली. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर रजतचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह प्रथम वाळपई सामुदायिक आरोग्य केंद्रात नेला होता. मात्र, उत्तरीय तपासणीसाठी तो गोमेकॉत पाठविला आहे. या प्रकरणाचा तपास वाळपई पोलिस करत आहेत.

नदीपात्र धोकादायक

भिरोंडा येथे म्हादई नदीचे पात्र अत्यंत खोल आणि धोकादायक मानले जाते. यापूर्वीही येथे अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. आज पुन्हा एकदा अशीच घटना घडल्यामुळे स्थानिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

Goa Drowning Death
Goa Cyber Crime: 'डिजिटल अरेस्ट'चा सापळा भेदला, मॅजिस्ट्रेटचे खोटे सोंग उघड; साताऱ्यात संशयित जेरबंद

बेतुल खाडीत १० वर्षांचा श्‍लोक बुडाला

रविवारची सुट्टी साधून खणगिणी-बेतुल येथे गेलेल्या बागवाडा-कुडचडे येथील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या कुटुंबातील श्‍लोक संजय नाईक हा १० वर्षीय मुलगा समुद्राला लागून असलेल्या खाडीत आंघोळ करत असताना भरतीचे पाणी खाडीत शिरल्याने बुडून मृत्युमुखी पडला. त्याला वाचविण्यासाठी सानिका (वय १७ वर्षे) या त्याच्या बहिणीने प्रयत्न केले असता, तीही बुडू लागली.

या कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यावर जवळचे लोक धावून आले आणि त्यांनी सानिकाला वर काढले. मात्र, श्‍लोकला ते वाचवू शकले नाहीत. ही दुर्घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. सानिका ही अत्यवस्थ असल्याने तिला तातडीने गोमेकॉत हलविले असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. श्‍लोक याचा मृतदेह सध्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. श्‍लोक हा कुडचडेच्या सीटीएन विद्यालयात सहावीत शिकत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com