काजू हंगाम ओसरला, फेणीच्या भट्ट्या थंडावल्या, बोंडूच्या कमतरतेमुळे उत्पादनात 50 टक्के मोठी घट; डिचोलीत फेणीचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

Goa Cashew Season 2026: तालुक्यात काजू पिकाचा हंगाम ओसरला असून फेणी व हुर्राक गाळपाच्या ‘खोर्णे’ (भट्ट्या) थंडावल्या आहेत. पुढील आठवड्यापर्यंत बहुतेक सर्व भट्ट्या बंद होण्याची शक्यता आहे.
cashew crop shortage impact on feni industry Goa
cashew crop shortage impact on feni industry GoaDainiak Gomantak
Published on
Updated on

डिचोली : तालुक्यात काजू पिकाचा हंगाम ओसरला असून फेणी व हुर्राक गाळपाच्या ‘खोर्णे’ (भट्ट्या) थंडावल्या आहेत. पुढील आठवड्यापर्यंत बहुतेक सर्व भट्ट्या बंद होण्याची शक्यता आहे. या हंगामाच्या मध्यंतरात काजूच्या बहरावर प्रतिकूल परिणाम झाल्याने यंदा काजू पिक कमी निघाले; त्याचा परिणाम फेणी व हुर्राक गाळपावर झाला आहे. पुरेसे बोंडू उपलब्ध न झाल्याने यंदा फेणी व हुर्राक गाळपात सुमारे ५० टक्के घट झाल्याचा दावा उत्पादकांनी केला आहे.

काजू हंगामाच्या सुरुवातीस काजूंना समाधानकारक बहर आला होता. मात्र एप्रिल महिन्याच्या मध्यंतरात काजूच्या बहरावर परिणाम झाला. स्थानिक काजू बागायतींमध्ये काजू बोंडू कमी झाले. त्यामुळे गाळपासाठी पुरेसे बोंडू उपलब्ध होऊ शकले नाहीत, असे उत्पादकांचे म्हणणे आहे.महाराष्ट्रातून बोंडू आणून गाळप काजू हे तालुक्यातील एक प्रमुख पीक आहे. तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात काजू बागायती आहेत. अनेक कुटुंबे या पिकावर अवलंबून आहेत. काजू बियाबरोबर बोंडूंनाही मागणी असते. भट्टीधारक हे बोंडू खरेदी करून त्यापासून हुर्राक व फेणीचे उत्पादन घेतात.

cashew crop shortage impact on feni industry Goa
Shiroda Crop Loss: शिरोड्या पावसाक लागून पिकावळीचें लुकसाण

काही उत्पादक स्थानिक बागायतींमधून उपलब्ध होणाऱ्या बोंडूंव्यतिरिक्त महाराष्ट्रातील वझरे, माटणे, दोडामार्ग आदी भागांतून बोंडू आयात करून गाळप करतात. तालुक्यात पुरेसे बोंडू मिळत नसल्याने सुमारे ५० टक्के बोंडू बाहेरून खरेदी केले जातात. यंदा बोंडूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याने काहींनी महाराष्ट्रातून बोंडू मिळवून मर्यादित गाळप केले; मात्र यंदा गाळपाचे प्रमाण फारच कमी राहिले आहे, असा उत्पादकांचा दावा आहे.

काजू हंगामात तालुक्यातील सर्वण, मये, कारापूर, नार्वे, धुमासे, कुडचिरे, उसप आदी भागांत काजू बोंडूंपासून फेणी व हुर्राकचे गाळप केले जाते. साधारण तीन महिने या भट्ट्या पेटलेल्या असतात. यंदाही विविध भागांत भट्ट्या सुरू होत्या; परंतु बोंडू कमी झाल्याने त्या थंडावल्या आहेत. डिचोली, नार्वे आदी काही भागांत भट्ट्या बंद झाल्या आहेत.

cashew crop shortage impact on feni industry Goa
Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

यंदा अपेक्षेप्रमाणे काजू बोंडू मिळाले नाहीत. त्याचा परिणाम गाळपावर झाला असून फेणी व हुर्राकचे उत्पादन घटले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादनात मोठी घट झाली आहे.

- तुकाराम गावडे, उत्पादक, नार्वे

स्थानिक बागायतींतून मिळणारे बोंडू हंगामाच्या मध्यावरच घटले. महाराष्ट्रातूनही बोंडू मिळणे कठीण झाले. त्यामुळे उत्पादन घटले आहे. यंदा फेणी उत्पादनात सुमारे ५० टक्के घट झाली आहे.

- तुळशीदास गावकर,

उत्पादक, उसप

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com