JCB Accident At Santinez  Dainik Gomantak
गोवा

St. Inez: इमारत जमीनदोस्त करतान स्लॅबवरून ‘जेसीबी’ कोसळला; चालक जखमी

JCB Accident: जीर्ण झाल्याने अखेर ही इमारत पाडण्याचे काम मागील दहा दिवसांपासून सुरू झाले होते

गोमन्तक डिजिटल टीम

सांतिनेजमधील मधुबन कॉम्प्लेक्ससमोरील जीर्ण झालेल्या इमारतीचा सांगाडा हटविण्याचे काम करणारा जेसीबी कमकुवत झालेल्या स्लॅबमधून खालच्या स्लॅबवर कोसळला. या घटनेत जेसीबी चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुबन जंक्शनजवळील उभारलेल्या इमारतीचा केवळ सांगाडा अनेक वर्षांपासून दिसत होता. अनेक वर्षे खांब आणि स्लॅब व काही ठिकाणी भिंती या इमारतीच्या नजरेस पडत होत्या. जीर्ण झाल्याने अखेर ही इमारत पाडण्याचे काम मागील दहा दिवसांपासून सुरू झाले होते.

सहामजली असलेल्या इमारतीवरील एक-एक स्लॅब तोडून ती इमारत हटविण्यात येत होती. आजूबाजूला वस्ती असल्याने जिलेटीनसारख्या स्फोटकांचा वापर करणे अशक्य असल्याने स्लॅब तोडूनच ही जागा मोकळी करण्याचे काम ‘एक्सल बिल्डर्स’ ही कंपनी करीत आहे.

मागील बाजूने इमारतीचे स्लॅब काढण्यास दहा-पंधरा दिवसांपूर्वी सुरवात झाली. शनिवारी सकाळी काम सुरू असताना जीर्ण झालेला स्लॅब ‘जेसीबी’चे ओझे पेलू शकला नाही आणि तो खालच्या मजल्यावर कोसळला. या अपघातात जेसीबी चालक जखमी झाला. जखमी चालकास तत्काळ गोमेकॉत उपचारासाठी हलविण्यात आले.

इमारतीबाबत अनेक तर्कवितर्क

ज्या कंपनीची ही इमारत आहे, त्यांनीच ती हटविण्यास सुरवात केली आहे. अनेक वर्षांपासून ही इमारत नक्की कोणाची आहे, हेच अनेकांना माहीत नव्हते. राजकारण्यांनी ती विकत घेतल्याचीही चर्चा होती. या इमारतीच्या परिसरातही बिल्डरच्या नावाचा फलकही नव्हता.

महापालिकेच्या कागदोपत्री नोंदीत ही इमारत असली तरी बांधकाम पाडण्याचे काम स्वतः बिल्डरनेच हाती घेतले आहे. कंपनीने जेसीबी थेट इमारतीच्या वरच्या स्लॅबवर नेऊन स्लॅब तोडण्यास सुरू केले होते. त्याशिवाय दर्शनी बाजूला इमारतीवर हिरवे आच्छादनही लावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT