Indian Racing Festival Mopa Dainik Gomantak
गोवा

Mopa Racing Festival: 14, 15 फेब्रुवारी रोजी रंगणार 'इंडियन रेसिंग फेस्टिवल'! 100 हून अधिक वाहतूक पोलिस ठेवणार नियंत्रण

Indian Racing Festival Mopa Goa: शर्यतीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी शंभरहून अधिक वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती विमानतळ वाहतूक पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Racing Festival 2026 : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा या परिसरात १४ व १५ फेब्रुवारी रोजी प्रथमच ‘द इंडियन रेसिंग फेस्टिवल’ आयोजित करण्यात आला आहे. या शर्यतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शर्यतीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी शंभरहून अधिक वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती विमानतळ वाहतूक पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी दिली.

ही शर्यत सुरू असताना परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकडे पोलिस आणि वाहतूक पोलिस लक्ष देणार आहेत. शिवाय संलग्न रस्ता, एकेरी मार्ग म्हणून चालू ठेवला जाईल. शिवाय मोपा विमानतळावर वाहने येण्या-जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रणाचा प्रयत्न असेल,अशी माहिती राऊत यांनी दिली.

‘मोपा’वर ‘स्ट्रीट रेस’ला हरकत

मोपा येथे आयोजित ‘गोवा स्ट्रीट रेस’ आणि ‘इंडियन रेसिंग फेस्टिव्हल’वरून नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रस्तावित शर्यतीमुळे विमानतळ सुरक्षा नियमांचे आणि सरकारी कराराचे गंभीर उल्लंघन होत असल्याचा आरोप करत, स्थानिक रहिवासी ज्ञानेश्वर वरक यांनी या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, नागरी विमानचालन संचालनालय आणि मुख्य सचिवांना अधिकृत पत्र पाठवले आहे. वरक यांनी आपल्या तक्रारीत ८ नोव्हेंबर २०१६ रोजी गोवा सरकार आणि ‘जीएमआर’ यांच्यात झालेल्या सवलत कराराचा उल्लेख केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT