Goa Street Race Mopa: ‘गोवा स्ट्रीट रेस’ रद्द करा! नागरिकांची आक्रमक भूमिका; गोवा कूळ-मुंडकार संघटनेचे पेडण्यात धरणे आंदोलन

Mopa Airport Goa Street Race: ॲड. जितेंद्र गावकर यांनी सांगितले की, मोपा विमानतळ जीएमआर कंपनीकडे असताना गोवा सरकारला तेथे अशाप्रकारची स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार नाही.
formula 4 goa street race
formula 4 goa street raceDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि. १४ व १५ फेब्रुवारी रोजी सरकारतर्फे आयोजित करण्यात येणारी ‘गोवा स्ट्रीट रेस’ (फॉर्म्युला ४) ही स्पर्धा तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी गोवा कुळ मुंडकार संघटनेतर्फे पेडणे येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी स्पर्धा रद्द करण्याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.या धरणे आंदोलनात गोवा कूळ-मुंडकार संघटनेचे समन्वयक दीपेश नाईक, पेडणे तालुका नागरिक समितीचे अध्यक्ष नितीन पटेकर, नामदेव तुळसकर, सूर्या साळगावकर, ॲड. जितेंद्र गावकर, संदीप कांबळी, नारायण गडेकर, गोवा ग्रीन संघटनेचे कार्यकर्ते आगुस्तीन मिरांडा, उदय महाले, संतोष मांद्रेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते आलेक्स नोरोन्हा आदी सहभागी झाले होते.

formula 4 goa street race
Formula 4 Racing Goa: ‘मोपा’वर रंगणार ‘फॉर्म्युला 4 रेसिंग थरार! ट्रॅक’ उभारणीसाठी हालचाली; 4 कोटींचा खर्च अपेक्षित

ॲड. जितेंद्र गावकर यांनी सांगितले की, मोपा विमानतळ जीएमआर कंपनीकडे असताना गोवा सरकारला तेथे अशाप्रकारची स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार नाही. तसेच विमानतळ परिसरात इंधन साठवण टाक्या असल्याने या स्पर्धेमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

formula 4 goa street race
Formula 4 Race Goa: ‘फॉर्म्युला 4’ रेससाठी नव्या जागेचा शोध! बांबोळी, वेर्णा पठाराची पाहणी; सलग 3 वर्षे होणार आयोजन

नोकऱ्यांची आश्वासने देऊन फसवणूक

दीपेश नाईक यांनी सांगितले की, मोपा परिसरातील सहा पंचायतींतील शेतकऱ्यांची जमीन अत्यल्प दरात विमानतळासाठी घेतली गेली असून आज त्या जमिनींची किंमत शंभरपटीने वाढली आहे. नोकऱ्यांची आश्वासने देऊन सरकारने स्थानिकांची फसवणूक केली असून, शेतकऱ्यांना विमानतळ प्रकल्पात भागीदारही करण्यात आलेले नाही. केवळ विमानतळासाठी दिलेल्या जमिनीवर कराराचा भंग करून पंचतारांकित हॉटेल व आता फॉर्म्युला ४ स्पर्धा आयोजित केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com