Illegal Restaurant:  Dainik Gomantak
गोवा

Illegal Restaurant: वागातोर येथे ‘रेस्टॉरंट’वर हातोडा

Illegal Restaurant: पर्यटन खात्याची कारवाई : हॉटेलचा काही भाग केला जमीनदोस्त

दैनिक गोमन्तक

Illegal Restaurant: वझरांत-वागातोर येथील किनारी भागात सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या ‘रोमियो लेन’ या रेस्टॉरंटचा बराचसा भाग शनिवारी (ता.२७) गोवा पर्यटन मंडळाकडून जमीनदोस्त करण्यात आला. उच्च न्यायालयाकडून हल्लीच देण्यात आलेल्या एका आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

आजच्या कारवाईमुळे या भागात बेकायदा व्यवसाय थाटून बसलेल्या अनेकांचे धाबे दणाणले असून येत्या काही दिवसांत या भागातील अनेकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हणजूण तसेच वागातोर येथील किनारी भागात स्थानिक पंचायतीला अंधारात ठेवून तसेच सीआरझेड नियमांचे खुलेआम उल्लंघन करीत अनेकांकडून बेकायदा शॅक्स तसेच रेस्टॉरंट्स उभारण्यात आले आहेत,

दरम्यान, या गोष्टीवरून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने अशा बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पंचायत तसेच गोवा पर्यटन महामंडळाला दिले होते.

न्यायालयाने स्थानिक हणजूण कायसूव पंचायत तसेच तेथील सचिवांना बेकायदा बांधकामांबाबत चुकीचा अहवाल सादर करण्यात आल्याचा आरोप करीत फटकारले होते.

उच्च न्यायालयाचे आभार

आजच्या कारवाईमुळे स्थानिक लोकांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले असून यापुढेही अशा कारवाया सतत सुरू ठेवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी हरमलकर व इतरांनी केली आहे.

हणजूण पोलिसांत अनेकांकडून तक्रारी

स्थानिक तसेच परप्रांतीय लोकांनी आपापल्या राजकीय वजनाचा गैरवापर करीत या भागात गेल्या अनेक वर्षांपासून सीआरझेड तसेच तत्सम प्राधिकरणे आणि गोवा पर्यटन महामंडळाच्या नियमांचा भंग करीत खुलेआम बेकायदा व्यवसाय सुरू केले होते. स्थानिक बायो डायव्हर्सिटी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून याबाबतीत वारंवार आवाज उठविण्यात येत होता. रात्री बेरात्री सुरू असलेल्या बेधुंद संगीत रजन्या तसेच पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात येत असलेल्या कानठळ्या बसविणाऱ्या म्युझिकमुळे स्थानिकांचे जगणे हैराण होऊन बसले होते. त्यामुळे हणजूण पोलिसांत अनेकांकडून तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT