Imtiaz Ali Statement on Alia Bhat  Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Imtiaz Ali Statement on Alia Bhatt: इम्तियाज अली यांना ज्या विषयाचा अनुभव नाही त्या विषयावर त्यांनी भाष्य करू नये. :विनिता नंदा

Akshata Chhatre

पणजी: सध्या गोव्यात आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अनेक सिनेकलाकार, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते गोव्याच्या दिशेने वळत आहेत. चित्रपट महोत्सवाच्या दरम्यान हे दिग्गज एकत्र येऊन चर्चा सत्र चालवतात आणि यामध्ये केलेल्या काही रोखठोक वक्तव्यांना धारेवर धरलं जातं.

हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता चित्रपट क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे. चित्रपट महोत्सवाच्या दरम्यान इम्तियाज अली यांनी चित्रपटांच्या सेट्सवर महिला कलाकारांच्या सुरक्षेबद्दल मत मांडलं होतं आणि याबद्दल पुरावा देताना त्यांनी आलिया भटच्या हायवे चित्रपटाचा दाखला दिला होता, मात्र काही वेळातच असं काहीही घडलेलं नाही म्हणत स्वतः इम्तियाज अली यांनी त्यांचं म्हणणं मागे घेतल्याने याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

गोव्यात सुरु असलेल्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी करीन कपूर आणि आलीय भट यांच्यासोबत चित्रपटांच्या सेट्सवर झालेल्या काही प्रसंगांचे उदाहरण देत महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित केला. याबद्दल बोलताना त्यांनी दोन किस्से शेअर केले केले होते एक "जब वी मेट" च्या सेटवर करीना कपूरबद्दल सकारात्मक किस्सा होता आणि दुसरा "हायवे" च्या सेटवर आलिया भट्टबद्दलचा किस्सा भेडसावणारा ठरला.

हायवेच्या शूटिंग दरम्यान पूर्ण टीमला वेगवेगळ्या भागांमध्ये जावं लागायचं आणि व्हॅनिटी व्हेन्स देखील नीट नव्हत्या.आलिया भट कपडे बदलत असताना एक माणूस सतत तिच्या आजूबाजूला फिरायचा म्हणून मी त्याला कामावरून काढलं होतं असं इम्तियाज अली म्हणले, आजपर्यंतच्या काळात असे प्रसंग मी तीन वेळा पहिले आहेत असं म्हणत त्यांनी महिलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.

मात्र काही काही तासांनंतर इम्तियाजने स्पष्ट केले की आलियासोबत अशी घटना घडली नाही आणि "हायवे" सेटवर कोणताही गैर व्यवहार झालेला नाही. आता इम्तियाज अली यांच्या बोलण्यात अचानक झालेल्या या बदलामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

काही लोकं इम्तियाज यांच्या सुरुवातीच्या विधानावर टीका करत आहेत. विनिता नंदा या चित्रपट निर्मातीने इम्तियाजच्या वक्तव्यावर जाहीर टीका केली आहे, तिच्या मते इम्तियाज अली यांना ज्या विषयाचा अनुभव नाही त्या विषयावर त्यांनी भाष्य करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT