Happy Birthday Imtiaz Ali: 'जब वी मेट' ते 'रॉकस्टार'; एकापेक्षा एक हिट देणारा इम्तियाज अली झाला 52 वर्षाचा

Happy Birthday Imtiaz Ali: इम्तियाज अली यांनी जब वी मेट , रॉकस्टार ,सोचा न था , आहिस्ता-आहिस्ता , लव आज कल या चित्रपटांधून आपली ओळख निर्माण केली आहे.
Imtiaz Ali
Imtiaz AliDainik Gomantak
Published on
Updated on

Happy Birthday Imtiaz Ali: प्रसिद्ध डायरेक्टर इम्तियाज अली आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. 16 जून 1971 साली झारखंडमधील जमशेदपूरमध्ये जन्मलेल्या इम्तियाज अली यांनी जब वी मेट , रॉकस्टार ,सोचा न था , आहिस्ता-आहिस्ता , लव आज कल या चित्रपटांधून आपली ओळख निर्माण केली आहे.

प्रेमाचा वेगळा अर्थ समजावून सांगणारे म्हणून त्यांच्या चित्रपटांची ओळख आहे. आज इम्तियाज अली वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात काही खास गोष्टी. इम्तियाज अली यांनी डायरेक्ट केलेल्या चित्रपटातील काही पात्रे अजरामर झाली आहेत.

रॉकस्टारमधील जॉर्डन

2011मध्ये आलेला रॉकस्टार हा चित्रपट तरुणीईच्या खास पसंतीस उतरल्याचे दिसून आले होते. रणबीर कपूर आपल्या ज़ॉर्डनच्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिल्याचे चित्रपटातील त्याच्या अभिनयातून समजते. ज़ॉर्डनचा प्रेम आणि करिय़र यातील संघर्षामधला प्रवास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येते.

Imtiaz Ali
'इंडिया...हू लिट द फ्यूज' माहितीपटावर अलाहाबाद HC ने घातली बंदी, अल जझीरा मीडियाला बजावले नोटीस

जब वी मेट मधील गीत

2007 मध्ये आलेल्या जब वी मेट हा चित्रपट आजही अनेकांचा आवडता चित्रपट आहे. यामध्ये शाहीद कपूर आणि करीना कपूर प्रमुख भूमिकेत दिसून आले होते. मैं तो अपनी फेवरेट हॅंू म्हणणारी गीत सगळ्याच्या लक्षात राहते.

याबरोबरच, 2015 मध्ये प्रदर्शित झालेला तमाशा चित्रपटातील वेदचे पात्र, 2014मधील हायवे मधील वीराचे पात्र आणि 2009मधील लव आज कल चित्रपटातील जयची भूमिकादेखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहे.

इम्तियाज अली यांच्या चित्रपटांनी प्रेमाची आगळी वेगळी व्याख्या प्रेक्षकांच्या समोर आणली. चित्रपटातील अफलातून असणाऱ्या पात्रांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com