IFFI Goa 2024: दिग्गजांकडून मार्गदर्शनाची संधी!! Creative Minds Of Tomorrow अंतर्गत नवख्या चित्रपट निर्मात्यांना खास प्रशिक्षण

Creative Minds Of Tomorrow IFFI 2024: 48 तासांत चित्रपट तयार करून दाखवणे हे या उपक्रमाचे वैशिष्ठ असेल
Creative Minds Of Tomorrow  IFFI 2024: 48 तासांत चित्रपट तयार करून दाखवणे हे या उपक्रमाचे वैशिष्ठ असेल
International Film Festival Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (CMOT) या नावांतर्गत एक खास उपक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये 100 निवडक चित्रपट निर्मात्यांच्या समावेश आहे आणि ते 13 विविध चित्रपट शाखांमधून असणार आहेत. गेल्यावर्षी देखील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला होता आणि उपक्रमांतर्गत एकूण 75 चित्रपट निर्मात्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.

CMOT चॅम्पियन्स म्हणून ओळखले जाणारे उद्योग तज्ञ यावेळी सहभागी पाच संघांना मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शकांमध्ये चिदानंद नाईक, सुवर्णा दास, अक्षिता वोहरा, अखिल दामोदर लोटलीकर आणि कृष्णा दुसाने यांसारख्या नामवंतांचा समावेश आहे.

Creative Minds Of Tomorrow  IFFI 2024: 48 तासांत चित्रपट तयार करून दाखवणे हे या उपक्रमाचे वैशिष्ठ असेल
IFFI 2024: गोवा विभागासाठी निवडले 14 चित्रपट! ‘गोवन डायरेक्टर्स कट’ नवीन विभाग; गोवारीकर आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष

मार्गदर्शनाव्यतिरिक्त, सहभागींना कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा, पटकथा लेखक चारुदत्त आचार्य आणि YRF स्टुडिओ चित्रपट निर्माता सैफ अख्तर यांच्यासह उद्योगातील दिग्गजांच्या नेतृत्वाखाली मास्टरक्लासचा भाग बनणायची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

48 तासांत चित्रपट तयार करून दाखवणे हे या उपक्रमाचे वैशिष्ठ असेल. यामध्ये सहभागी निर्मात्यांना "तंत्रज्ञानाच्या युगातील नातेसंबंध (Relationships in the Age of Technology)" या थीमवर लघुपट तयार करण्याचा टास्क दिला जाणार आहे. हा टास्क पूर्ण करण्यासाठी सहभागींना प्रत्येकी 20 सदस्यांच्या पाच संघांमध्ये विभागले जाईल.

या उपक्रमात टॅलेंट कॅम्पचाही समावेश आहे आणि इथे सहभागींना आघाडीच्या मीडिया आणि मनोरंजन कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर त्यांची कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. उपक्रमातील सर्व सहभागी IFFI च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील तसेच फिल्म बाजार आणि भारतीय चित्रपटांचा आगळावेगळा सोहळा अनुभवातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com