Hyderabad tourists Arrested in Goa For Rash Driving And Two accidents Dainik Gomantak
गोवा

Hyderabad Tourists Arrested in Goa: हैदराबाद पर्यटकांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे दोन अपघात; पर्वरीत तणावपूर्ण वातावरण, पाठलाग करून अटक

दोन अपघातानंतर गुरुवारी रात्री पर्वरीत तणाव निर्माण झाला.

Pramod Yadav

Hyderabad Tourists Arrested in Goa For Rash Driving And Two Accidents: हैदराबाद येथील पर्यटकांच्या एका ग्रुपने बेदरकारपणे कार चालवत दोन अपघात केल्याने पर्वरीत मोठा राडा झाला. अपघात झाल्यानंतर पर्यटकांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, स्थानिकांनी पाठलाग करून त्यांना पकडून देण्यात पोलिसांना मदत केली. मात्र, यामुळे गुरुवारी रात्री पर्वरीत मोठा तणाव निर्माण झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून प्रवास करणाऱ्या हैदराबाद येथील पर्यटकांच्या एका ग्रुपने बेदरकारपणे वाहन चालवत वागातोर आणि काणका येथे दोन अपघात केले.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर पर्यटकांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थानिकांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली.

अपघाताची पहिली घटना वागातोर येथे घडली, त्यानंतर पर्यटकांनी पळ काढला मात्र, स्थानिकांनी त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, याचवेळी काणका येथे त्यांच्या वाहनाचा दुसरा अपघात झाला. आणि येथून देखील पर्यटक पसार झाले.

हैदराबादच्या हे पर्यटकनंतर पर्रा रस्त्यावरून गिरी येथे मुख्य रस्त्यावर आले आणि पर्वरीत दाखल झाले. पर्यटकांनी पर्वरीत एका बंगल्यात आसरा घेतला. दरम्यान, त्यांचा पाठलाग करणाऱ्या जवळपास पन्नास स्थानिक लोक बंगल्याजवळ गोळा झाले.

अखेर पोलिसांच्या (Goa Police) मदतीने हैदराबादच्या या पर्यटकांना अटक करण्यात आले. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणीसाठी रवानगी केली.

स्थानिकांनी या पर्यटकांच्या विरोधात हिट एन्ड रनची केस दाखल करत, सक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, अपघातामुळे झालेल्या नुकसानाची भरपाईची देखील मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: ‘देवाच्या पुनवे’ला उसळली गर्दी! देवी सातेरी, भगवतीचा उत्सव; आगरवाडा, पार्सेवासीय भक्तीत दंग

Goa Live News Updates: चलो बुलावा आया है! काँग्रेस हायकमांडकडून गोव्यातील नेत्यांना दिल्लीत येण्याचे आदेश

Purple Fest: पर्पल फेस्टसाठी गोवा सज्ज! 15 हजारांहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

SCROLL FOR NEXT