Goa Crime: पोलिस गोळीबार प्रकरण; संशयित मेरठमध्ये जेरबंद

अद्याप दोघे फरार : आंतरराज्य कोम्बिंग ऑपरेशन; पोलिसांची धडाडी
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime झुआरीनगर येथे बंगल्यात चोरीचा प्रयत्न करणारे आणि पोलिसांवर गोळीबार करून पळालेले अनस (22) आणि साजिद शमशाद अन्सारी (36) या मूळच्या मेरठ, उत्तर प्रदेशातील संशयितांच्या दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांनी आंतरराज्यीय कारवाईत मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील आणखी दोन संशयित अद्याप फरार आहेत.

झुआरीनगर येथे एका बंगल्यात चोरीचा प्रयत्न करत असतानाच तेथे पोलिस पोचल्याने चोरांनी घटनास्थळावरून पळ काढत पोलिसांवर दोन राऊंड गोळीबार केला होता.

यात पीएसआय स्वप्नील नाईक यांच्या डोक्यावरून एक गोळी गेली, तर होमगार्ड प्रल्हाद नाईक यांना गोळी रस्त्यावर आदळून त्यांच्या गुडघ्यावर लागली होती.

Goa Crime
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या आजचे भाव

त्यानंतर वेर्णा पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आणि त्या दोघांचे रेखाचित्रही जारी केले होते. या चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पोलिस ठाण्यांमधून पथके तयार केली आहेत.

पोलिसांनी वास्को, वेर्णा, मुरगाव, मायणा-कुडतरी, फातोर्डा, मडगाव आणि कोलवा येथील निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार केली आहेत. या पथकांना मुरगाव आणि मडगाव उपविभागाचे डीवायएसपी मार्गदर्शन करत आहेत.

आंतरराज्य ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात संशयितांचा शोध सुरू करण्यात आला असून उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांचीही मदत घेण्यात येत आहे. संयुक्त पथकांच्या प्रयत्नांमुळे मेरठमधील साजिद अन्सारी या आणखी एका आरोपीला पकडण्यात यश आले.

वेर्णा पोलिसांनी संशयितांविरुद्ध कलम ४५७, ३८०, ५११ सह ३४ आयपीसी आणि आर्म्स ॲक्ट कलम ३,२५ नुसार गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Goa Crime
Goa ST Community Reservation: बाळ्ळीच्या आंदोलनात युवा कार्यकर्त्यांचा बळी भाजप - संघामुळेच गेला:- शिरोडकर

ते’ चेन स्नॅचर

संशयितांच्या तपासादरम्यान, वेर्णा पोलिस स्टेशन आणि मायणा-कुडतरी येथे नोंदवलेल्या स्नॅचिंग व चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असलेले हेच आरोपी असल्याचे समोर आले. आरोपींनी चिखली येथे सोनसाखळी हिसकावली होती, तर लोटली येथील वृद्ध महिलेचे दागिने हिसकावून पळ काढला होता.

सीसीटीव्ही फुटेज

तपासादरम्यान तांत्रिकदृष्ट्या पाळत ठेवली होती, तसेच स्थानिक गुप्तचरही तैनात केले होते. सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर सर्वेक्षण आणि गुप्तचर माहितीच्या आधारे अनस नावाच्या संशयितास ताब्यात घेण्यात आले. मात्र, या प्रकरणातील दोघे फरार आहेत.

पोलिसांना 25 हजारांचे बक्षीस

या प्रकरणातील आणखी दोन आरोपी सध्या फरार असून त्यांच्या मागावर वेगवेगळी पथके असून त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांत कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी या धडाडीच्या कामगिरीबद्दल पोलिसांना 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com