Goa Wife Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पत्नीवरती होता संशय, रागाच्या भरात केला खून; शिरोड्यातील प्रकरणात पतीला 10 दिवसांची कोठडी

Ponda Shiroda Wife Murder Case: तळपण-वाडा, शिरोडा येथील हेमा गावकरचा खून तिचा पती चेतन गावकर याने केल्याचे उघडकीस आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Sameer Panditrao

फोंडा: तळपण-वाडा, शिरोडा येथील हेमा गावकरचा खून तिचा पती चेतन गावकर याने केल्याचे उघडकीस आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. चेतन याला अटक करून रविवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चेतन याला पत्नीच्या वर्तनावर संशय होता, त्यामुळे त्याने पत्नीचा खून केल्याचा कयास आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.या दांपत्याचा छोटा मुलगा सध्या चेतनच्या आईवडिलांकडे आहे.

चेतन व हेमा यांच्यात रोजच खटके उडत होते. शनिवारी चेतनने रागाच्या भरात हेमाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा संशय त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. सुशिक्षित असलेल्या चेतनने हा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आज उपजिल्हाधिकारी करणार पंचनामा

चेतन आणि हेमा यांच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली नसल्याने उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत पंचनामा करण्यात येणार आहे.

धारबांदोडा उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा पंचनामा सोमवारी करण्यात येणार असून त्यानंतर हेमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT