Goa Crime: फोंड्यात पत्नीचा निर्घृण खून, आरोपी पती स्वत: पोलिस ठाण्यात हजर; पुढील तपास सुरू

Ponda Shiroda Murder Case: शिरोडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून पतीने स्वतःच्या पत्नीचा खून केल्याची माहिती समोर झाली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: शिरोडा येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथे एका पतीनं आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आलीय. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.तर खून केल्यानंतर पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही शिरोड्यातील एका खासगी शाळेत पीए शिक्षिका म्हणून कार्यरत होती, तर तिचा पती फोंडा मामलेदार कार्यालयात नोकरीला आहे.

घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची तपासणी सुरू आहे.

Goa Crime
Goa Pocso Court: 19 वर्षीय गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, पुराव्या अभावी बापाची निर्दोष मुक्तता

हे जोडपे दोन वर्षांपूर्वी शिरोडा येथे वास्तव्यास आले होते. त्यांना एक आठ वर्षांचा मुलगा असून तो बालवाडीत शिकत असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास फोंडा पोलीसांकडून सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pradeep Yadav Bail Rejected
POCSO Case Goa
Pune Kolhapur Express AI Incident
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com