Belagavi Crime: आधी मैत्री केली अन् नंतर घात केला! बेळगावात 15 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; 5 अटकेत

Kakati Sexual Assault Case: 15 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केल्यानंतर तिला काकतीजवळील निर्जन टेकडीवर नेऊन तिच्यावर सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांसह पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली.
Belagavi Crime
Belagavi CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

बेळगाव: 15 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केल्यानंतर तिला काकतीजवळील निर्जन टेकडीवर नेऊन तिच्यावर सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांसह पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली. तर एका संशयिताचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात पीडितेने एपीएमसी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

आधी मैत्री नंतर अत्याचार

शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी रविवार (1 जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की पीडित मुलगी आणि संशयित हे बेळगाव जिल्ह्यातील आहेत, पीडित अल्पवयीन मुलीशी मैत्री करणाऱ्या एका संशयिताने तिला आमिष दाखवून काकती जवळच्या टेकडीवर नेले आणि तिथे असलेल्या इतर पाच जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

Belagavi Crime
Karanataka Election: ऑन ड्यूटी 24 तास! गोवा, महाराष्ट्रातून येणाऱ्या अवैध मद्य, पैसा यावर कर्नाटकचे लक्ष

आरोपींनी (Accused) घटनेचे चित्रीकरण केले. ते चित्रिकरण दाखवून जानेवारीमध्ये पुन्हा तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी एपीएमसी पोलिस स्थानकात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पाच जणांना अटक केली आहे.

Belagavi Crime
Illegal Fishing: 'ही' घुसखोरी नाही तर नियमांतील तफावत! कर्नाटकच्या मच्छिमारांनी मंत्री हळर्णकरांसमोर मांडली बाजू

मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात अत्याचाराची घटना

काही दिवसांपूर्वी, मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने गोव्यात खळबळ उडवून दिली होती. एका अल्पवयीन मुलीला स्कूटरवरुन नेऊन तिच्यावर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता. मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घडली होती. याप्रकरणी गोवा (Goa) पोलिसांनी एका नेपाळी तरुणाला अटक केली होती. शुभम ओली असे या संशयिताचे नाव होते. पोलिसांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हाही दाखल केला. संशयितांवर गोवा बाल कायदा कलम 8 आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्याची पोलिसांनी नोंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com