Bicholim Sports Ground Dainik Gomantak
गोवा

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Bicholim Shivaji Maharaj ground: मोठा इतिहास असलेल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची सध्या दूरवस्था झाली असून हे मैदान असुरक्षित आणि धोकादायक बनले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: मोठा इतिहास असलेल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची सध्या दूरवस्था झाली असून हे मैदान असुरक्षित आणि धोकादायक बनले आहे. भतग्राम अर्थातच डिचोली हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाची साक्ष देणाऱ्या शहरातील या ऐतिहासिक मैदानाची देखभाल करण्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

या मैदानाची फाटके मोडली असून खांबही कोसळण्याच्या वाटेवर आहे. या मैदानावर फुटबॉल, क्रिकेट स्पर्धांसह प्रशिक्षणही देण्यात येत आहे. त्यामुळे या मैदानावर मुलांसह खेळाडूंचा कायम वावर असतो. दुसऱ्या बाजूने या मैदानाचे सौंदर्यीकरण करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. मात्र, या मैदानाचा मालकी हक्क डिचोली कोमुनिदादकडे असल्यामुळे सौंदर्यीकरण कामात मोठा अडसर निर्माण झाला आहे. जोपर्यंत कोमुनिदादला विश्वासात घेत नाही, तोपर्यंत नियोजित प्रस्ताव मार्गी लागणे कठीण आहे.

खांब कोसळण्याच्या अवस्थेत

२०१७ साली या क्रीडा मैदानाचे विकसित काम करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याची देखभाल करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे या क्रीडा मैदानाची अवस्था सध्या अत्यंत वाईट बनली आहे. जुन्या बसस्थानकाच्या समोरील या क्रीडा मैदानाच्या मुख्य फाटकाजवळील एका खांबाला तडे गेले असून हा खांब कोसळण्याच्या वाटेवर आहे. हा खांब कोसळल्यास खांबाला जोडलेल्या ‘ग्रील्स’चीही मोडतोड होणार आहे. या मैदानावर लहान मुलांसह खेळाडूंचा सदैव वावर असतो. अशावेळी जर एखादेवेळी हा खांब कोसळला, तर अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीतीही वर्तविण्यात येत.

सौंदर्यीकरण प्रस्ताव अडचणीत

सौंदर्यीकरण कामांतर्गत शहरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला नवी झळाळी देण्याचा प्रस्ताव आहे. या कामांतर्गत मैदानावर कृत्रिम ‘टर्फ’ बसविण्यात येणार आहे. नगरविकास खात्याकडून या कामाला जवळपास मान्यता मिळाल्यातच जमा आहे. या कामावर सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. महिन्यापूर्वी नगरविकासमंत्री विश्वजीत राणे फूटसाल मैदानाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी डिचोलीत आले होते.

त्यावेळी त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा विकास करण्यासाठी सरकार इच्छुक असून त्यावर दहा ते पंधरा कोटी खर्च करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र, या मैदानाच्या मालकी हक्काच्या मुद्यावरून मैदानाच्या विकसित कामाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. पालिका यावर कोणता तोडगा काढते याकडे डिचोलीवासीयांचे खास करून खेळाडूंचे लक्ष लागून राहिले आहे.

फाटकांची मोडतोड

जुलै २०२४ मध्ये भर पावसाळ्यात जुन्या बसस्थानकावरील ‘गोळ’ नामक जुनाट भले मोठे झाड कोसळले होते. त्यावेळी जुन्या बसस्थानकासमोर मैदानाच्या कोपऱ्यात झाड कोसळून ‘ग्रील्स’ची मोडतोड झाली होती. या घटनेला दोन वर्षे होत आली आहेत. मात्र, आजपर्यंत नवीन ‘ग्रील्स’ बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मैदानाचा एक कोपरा उघड्या अवस्थेत आहे. त्यानंतर या मैदानाच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या दोन्ही फाटकांच्या गेट मोडून पडल्या आहेत. त्यांची दुरुस्तीही करण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT