Manish Jadhav
हरिश्चंद्रगडाचा इतिहास तब्बल 1400 वर्षे जुना आहे. या किल्ल्याची निर्मिती 6व्या शतकात कलचुरी राजवंशाच्या काळात झाली. किल्ल्यावरील प्राचीन लेणी आणि मंदिरे या कालखंडातील समृद्ध वास्तुकलेची साक्ष देतात.
महान संत आणि योगी चांगदेव महाराज यांनी या किल्ल्यावर काही काळ वास्तव्य केले होते. येथेच त्यांनी तपश्चर्या केली आणि 'तत्त्वसार' या ग्रंथाची रचना केली, ज्यामुळे या गडाला ऐतिहासिकसोबतच आध्यात्मिक महत्त्वही प्राप्त झाले.
पौराणिक कथेनुसार, हा किल्ला सूर्यवंशी राजा हरिश्चंद्र यांच्याशी जोडला गेला. किल्ल्यावरील सर्वात उंच शिखर 'तारामती' हे नाव राजा हरिश्चंद्रांची पत्नी राणी तारामती यांच्यावरून पडले असल्याचे मानले जाते.
17व्या शतकात या किल्ल्यावर मराठ्यांचे नियंत्रण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि उत्तर महाराष्ट्रावर नजर ठेवण्यासाठी या गडाचा मोक्याचा लष्करी तळ म्हणून वापर केला होता.
1685च्या सुमारास मुघलांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला होता. मात्र, 1747मध्ये मराठ्यांनी पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मुघलांशी जोरदार संघर्ष करुन हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील केला आणि कृष्णराव जोशी यांना येथील किल्लेदार बनवले.
गडावर असलेले हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे 'हेमाडपंती' शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या मंदिराच्या परिसरात मंगळगंगा नदीचा उगम होतो. मंदिराची रचना अशी आहे की उन्हाळ्यातही यातील पाणी अत्यंत थंड असते.
येथील केदारेश्वर गुहेत पाच फूट उंच शिवलिंग आहे, जे पूर्णपणे पाण्याने वेढलेले आहे. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे, हे मंदिर पूर्वी चार खांबांवर उभे होते.