Goa Flood Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: उंच लाटांचा धोका, 'अंजुणे'मधून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कारवारशी संपर्क तुटला

Goa Monsoon: नदीकाठच्या गावांमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात शनिवारपासून पावसाने उग्र रूप धारण केले असून आज मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहिला. अंजुणे धरणाचे चारही दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या गावांमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कर्नाटक राज्यातही पावसामुळे हाहाकार उडाला असून कारवारचा गोव्याशी संपर्क तुटला आहे. तसेच हवामान खात्याने समुद्रकिनारी उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

किनारी भागातील नागरिक आणि मच्छीमारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाने जोर धरल्‍याने राज्‍यातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. मंगळवारीही रेड अलर्ट जारी केला होता. अंजुणे धरणाने ९० मीटरची पाण्‍याची पातळी ओलांडल्याने चारही दरवाजे सकाळी उघडण्‍यात आले. केरी, सर्वण, कारापूर नदीकाठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

पणजीतील रस्‍ते पाण्‍याखाली

राजधानीत सोमवारी रात्री उशिरा बराच काळ १८ जून मार्ग पाण्‍याखाली गेला होता. अनेक दुकानांत पाणी शिरून नुकसान झाले. मंगळवारी सकाळपासून पणजी व आजूबाजूच्‍या भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ‘स्‍मार्ट सिटी’ कामातील फोलपणा पावसाने पुन्‍हा एकदा दाखवून दिला आहे.

उंचच उंच लाटा

गोवा हवामान खात्याने समुद्रकिनारी उंच लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याने समुद्र किनाऱ्यालगतच्या नागरिकांना आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यात १७ आणि १८ जुलै रोजी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

काणकोण तालुक्यात सर्वाधिक पर्जन्य

गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक पाऊस काणकोण तालुक्यात १८६ मिमी पडला. त्याखालोखाल पणजी १७७.२ मिमी, फोंडा १४७.८ मिमी, जुने गोवे १४०.६ मिमी, मुरगाव १३६.६ मिमी, केपे १३०.४ मिमी., सांगे १२२.२ मिमी, मडगाव १२० मिमी, दाबोळी ११३.२ मिमी, म्हापसा ८७.४ मिमी, पेडणे ८२.४ मिमी, साखळी ६५.२ मिमी, वाळपई ३३.२ मिमी असा पाऊस पडला.

सरासरीपेक्षा ४५ टक्के पाऊस जास्त

राज्यात १ जून ते १६ जुलै रोजी सकाळपर्यंत एकूण ८४ इंच (२१३३.३ मिमी.) पाऊस पडला असून सरासरीपेक्षा हा पाऊस ४५ टक्के अधिक असल्याची माहिती हवामान खात्याच्या वेधशाळेने दिली आहे.

अंजुणे धरणाने ९० मीटरची पाण्‍याची पातळी ओलांडल्याने चारही दरवाजे उघडण्‍यात आले.

कोकण रेल्‍वे मार्गावरील अनेक गाड्या अन्‍यत्र वळविल्‍या; तर चार गाड्या रद्द केल्‍या आहेत.

गोवा-मंगळुरू राष्ट्रीय महामार्ग होता ठप्प.

मडगाव ते कारवार महामार्ग रात्री उशिरापर्यंत ठप्प होता. तसेच कारवारहून अंकोला पुढे यल्लापूर मार्गही पावसामुळे बंद राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT