Anjunem Dam : अंजुणे धरणातून लवकरच जलविसर्ग! जलसाठा ८७.३० मीटर

Anjunem Dam : धरण क्षेत्रात तसेच चोर्ला डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन या एकूण ९३.२ मीटर क्षमतेच्या धरणातील पाण्याची पातळी ९० मीटर झाल्यानंतर त्यातील पाणी सोडण्यास प्रारंभ होतो.
Anjune Dam
Anjune DamDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी, केरी-सत्तरीतील अंजुणे धरण हे लवकरच फुल्ल होण्याच्या मार्गावर असून येत्या दोन तीन दिवसांत या धरणातून अतिरिक्त पाणी नदीत सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आज शुक्रवार १२ जुलै रोजी धरणाने ८७.३० मीटर इतकी पाण्याची पातळी गाठली. आता ९० मीटरपर्यंत पाणी पातळी पोहोचताच अतिरिक्त पाणी धरणातून बाहेर सोडण्यात येणार आहे. याबाबतची नोटीस गुरूवार ११ जुलै रोजी खात्यातर्फे जारी करण्यात आली आहे.

Anjune Dam
B Sai Praneeth Retirement: जागतिक चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचणाऱ्या बी साई प्रणीतची निवृत्ती...वयाच्या 31 व्या वर्षी केला बॅडमिंटनला अलविदा

९३.२ मीटर इतकी क्षमता असलेल्या या धरणाने यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ दिवस अगोदरच ८७ मीटर ही पातळी गाठली आहे. गेल्यावर्षी २४ जुलै २०२३ रोजी या धरणाची पातळी ८७.५५ मीटर झाली होती. तर पाऊस १०० इंच झाला होता. यावर्षी आज २४ जुलै रोजी धरण क्षेत्रातील एकूण पाऊस ८३ इंच झाला आहे.

धरण क्षेत्रात तसेच चोर्ला डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन या एकूण ९३.२ मीटर क्षमतेच्या धरणातील पाण्याची पातळी ९० मीटर झाल्यानंतर त्यातील पाणी सोडण्यास प्रारंभ होतो. यावर्षी पाऊस वेळेवर सुरू झाल्याने सरासरीप्रमाणेच धरण भरायला सुरुवात झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com