Goa Rain Update: अक्षरशः धुमाकूळ! घरांची पडझड, कोट्यावधींचे नुकसान

Goa Monsoon: यंदाच्या जुलैमध्‍ये एकाच दिवशी सर्वाधिक पडलेला पाऊस; २४ तासांत ६ इंच कोसळला
Goa Monsoon: यंदाच्या जुलैमध्‍ये एकाच दिवशी सर्वाधिक पडलेला पाऊस; २४ तासांत ६ इंच कोसळला
Goa Rain LossDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात गेल्‍या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. घरे कोसळणे, झाडे उन्‍मळून पडणे, दरडी कोसळणे तसेच शेती-बागायतींची हानी सुरूच आहे. दरम्‍यान, उद्या मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्‍यात आला आहे.

मागील २४ तासांत राज्यात एकूण १५३.३ अंश सेल्सिअस म्हणजेच तब्बल ६.०३ इंच पाऊस पडला. यंदाच्या जुलैमध्‍ये एकाच दिवशी सर्वाधिक पडणारा हा पाऊस ठरला आहे. ७ जुलै रोजी ९ इंच पाऊस पडला होता. दरम्‍यान, मागील २४ तासांत पेडण्यात सर्वाधिक १९८.२ मि. मी. म्हणजेच ७.८० इंच पावसाची नोंद झाली.

मोठ्या प्रमाणात पडत असलेल्‍या पावसामुळे राज्यातील चापोली धरण पूर्णपणे भरले असून काही भरण्याच्या मार्गावर आहेत. सरासरी पावसाच्या तुलनेत आजमितीस तब्बल ४१.६ टक्के अधिक पाऊस पडला आहे.

Goa Monsoon: यंदाच्या जुलैमध्‍ये एकाच दिवशी सर्वाधिक पडलेला पाऊस; २४ तासांत ६ इंच कोसळला
Goa Rain: धुवांधार पावसामुळे अग्निशामक दलाची होतेय दमछाक; राज्यात अनेक ठिकाणी पडझड

कोठे, काय घडले?

१) डिचोली : श्री शांतादुर्गा शिशुवाटिकेला लागून असलेली भिंत कोसळली. सुट्टी असल्‍याने अनर्थ टळला.

२) डिचोली : वडाच्या झाडाखाली अडकून पडलेल्या गाडीतील महिलेची ५ तासांनंतर सुखरूप सुटका.

३) शिगाव : सुकूर फर्नांडिस यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून मोठे नुकसान.

४) पेन्हा द फ्रान्स : पडक्या घराची भिंत कोसळली.

५) काणकोण : तालुक्‍याची तहान भागविणारे चापोली धरण पूर्णपणे भरले.

६) फातोर्डा : चिरेखाणीच्‍या काठावर असलेल्‍या घराची भिंत कोसळली.

७) केपे : कुशावती नदीला पुन्‍हा पूर. पारोडा पूल पाण्‍याखाली, संपर्क तुटला.

८) पर्ये : वाळवंटी किनारी कठडा कोसळल्याने पर्ये-साखळी रस्ता धोकादायक.

९) सालेली-सत्तरी: दोन घरे कोसळली; सुमारे पाच लाखांचे नुकसान.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com