Harmal Beach  Dainik Gomantak
गोवा

Harmal Beach: हरमल किनारी भागात हॉटेल्स हाऊसफुल्ल!

New Year Celebration: पर्यटकांची गैरसोय- कित्येकांनी वाहनांमध्येच झोप घेतली

दैनिक गोमन्तक

Harmal Beach: हरमल येथील किनारी भागांत सध्या नववर्षाचे वेध लागले आहेत. मंगळवारी सकाळी खाजगी प्रवाशी बसने 15 जणांचा गट उतरला व हॉटेल्सची शोधाशोध केली, मात्र सर्वत्र हाऊसफुल्लचे फलक आळलल्याचे त्यांनी सांगितले. निवासाची व्यवस्था न झाल्याने पर्यटकांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.कित्येकांनी पार्किंग लॉटमध्ये वाहनात झोपणे पसंत केल्याचे दिसून आले.

सध्या किनारी भागांत देशी पर्यटकांची गर्दी वाढत असून, विदेशी पर्यटकांच्या वास्तव्यामुळे हॉटेल्स व हट्स फुल्ल झाल्याचे समजते.किनारी भागांत वास्तव्य करण्यासाठी अधिकतर पर्यटकांनी पसंती दिल्याने गेस्ट हाऊस, हट्स,घरे आदींचे बुकिंग फुल्ल झाले होते.

परवापर्यंत आलेल्या पर्यटकांना घरे,रूम्स उपलब्ध न झाल्याने कित्येकांनी किनाऱ्यापासून दूर ठिकाणी राहणे पसंत केल्याचे दिसून आले.एरव्ही दरमहा 10-15 हजार रुपये भाडे असलेले गेस्ट हाऊसेसकडून आठशे- नऊशे रुपये प्रतिदिन भाडे आकारले जात आहे.

15 दिवसांत महिन्याची कमाई होत असल्याचे व्यावसायिक मिनी फेर्नांंडिस यांनी सांगितले. कित्येक पर्यटकांनी रेस्टॉरंटऐवजी रस्त्यावर स्वतः स्वयंपाक करून जेवण, नाश्ता घेणे पसंत केल्याचे हॉटेल व्यावसायिक नरेंद्र शर्मा यांनी सांगितले.

पर्यटकांना वाहनांची कमतरता

सध्या किनारी भागांत दाखल झालेल्या पर्यटकांना भाडेपट्टीने वाहने मिळणे कठीण झाले आहे.ह्या भागात सध्या पर्यटक मोठ्या संख्येने उतरल्याने दुचाकी गाड्या महिना,आठवड्याच्या मुदतीवर भाडेपट्टीने नेल्याचे व्यावसायिक पीटर कार्व्हालो यांनी सांगितले.

पार्किंग रेट किंचित वाढले!

किनारी भागांत सरकारी पार्किंग नाही,मात्र खाजगी तत्वावर पार्किंगची सोय असल्याने पर्यटकांची चांगली सोय होत आहे.सध्या नववर्ष स्वागतावेळी पार्किंग शुल्क किंचित चढे असतात, असे एका कंत्राटदाराने सांगितले. तर वाहनांच्या बेशिस्त पार्किंगवर पेडणे वाहतूक निरीक्षक विश्वजित चोडणकर व सहकाऱ्यांनी नियंत्रण ठेवल्याने यंदा नाताळच्यावेळी वाहतूक कोंडीची समस्या जाणवली नसल्याचे वाहनचालक प्रदीप वस्त यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT