Calangute Beach: बार्देश तालुक्यातील किनारे गर्दीने फुलले

किनारी भागातील सर्व हॉटेल्स पर्यटकांमुळे फुल झाली आहेत.
Calangute beach
Calangute beach Dainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Beach: जगप्रसिध्द कळंगुट किनाऱ्यावर देशी पर्यंटकांनी नववर्षाची सुट्टी घालवण्यासाठी गर्दी केलेली आहे. विदेशी पर्यटक कमी असले तरी स्थानिक व देशी पर्यंटक कुटुंबीयांसमवेत मोठया संख्येने दाखल झालेले आहेत. काही प्रमाणात विदेशी पर्यटकही आलेले आहेत. त्यामुळे किनारी भागातील हॉटेल तसेच इतर परिसरातील हॉटेलमध्ये पर्यटक उतरलेले आहेत.

मुलांच्या शाळांना सुट्ट्या पडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांनीही सुट्या घेऊन यंदाही नाताळची सुट्टी गोव्यात घालवणे पसंत केले आहे. कळंगुट, बागा, हणजूण, कांदोळी या बार्देश तालुक्यातील महत्वाच्या समुद्र किनारी पर्यटक लाखोंच्या सख्येने उतरलेले आहेत.

विदेशी पर्यटक अजून म्हणावे तसे आलेले नसले तरी काही दिवसात येतील, असे व्यावसायिकांनी गृहीत धरले आहे. कळंगुट, बागा, कांदोळी, हणजूण किनारी शॅक उभारणे, पलंगांची व्यवस्था करणे सुरू आहे. काही पर्यंटकांची किनारी भागात हॉटेलमध्ये वस्ती आहे तर, काहींनी म्हापसा, पणजी येथे वास्तव्य केले आहे.

Calangute beach
Goa Night Party: कुणाच्या आशीर्वादाने रात्रीचा दिवस?

म्हापसा मार्केटला पर्यटकांची भेट

देशी व विदेशी पर्यटक गोव्यात येतात. त्यावेळी ते उत्तर गोव्यातील प्रमुख म्हापसा पालिका मार्केटला भेट दिल्याशिवाय जात नाहीत. या मार्केटमध्ये सर्व तऱ्हेच्या वस्तू मिळतात त्या खरेदी करण्यासाठी हे पर्यटक आवर्जून येतात. त्यामुळे पर्यटकाची म्हापसा मार्केटमध्येही गर्दी झालेली असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Tourists Air Gun Threat
Nepal Border Arrest
Goa Shack Policy 2026
Goa River Pollution
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com