Casino Dainik Gomantak
गोवा

कॅसिनोंना आता 18 ऐवजी 28 टक्के जीएसटी

टीआरयुची एकूण स्पर्धा प्रवेश रकमेच्या 28 ते 30 टक्के शुल्क आकारण्याची शिफारस

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील कॅसिनो शुल्कांमध्ये वाढ केली असतानाच आता जीएसटीचा दणका सहन करावा कॅसिनोना लागत आहे. सरकारने 18 टक्यांवरुन 28 टक्के जीएसटीची वाढ केली आहे. याचा बोजा पडल्यामुळे पर्यटक कॅसिनोकडे पाठ फिरवू शकतात. त्यामुळे कॅसिनो व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

एका कॅसिनो मालकाने सांगितले की, राज्य सरकारला कॅसिनो शुल्क वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण वर्षाची भरावी लागत होती. आता राज्य सरकारने सुट दिली असली तरी प्रत्येक महिन्याला भराव्या लागणाऱ्या शुल्कावर अतिरिक्त दहा टक्के रक्कम अगोदरच भरावी लागत आहे. कॅसिनोत वापरल्या जाणाऱ्या चिप्स आणि क्वाइनवर 15 टक्के टॅक्स भरावा लागतो. प्रती प्रवाशी 700 रुपये हे सरकारला जमा करावे लागतात आणि बोटींसाठी 20 हजार रुपये भरावे लागतात, अशा स्थितीत लक्झरी टॅक्सनुसार सर्व व्यवहारावर 28 टक्के जीएसटी भरावा लागत असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे हा टॅक्स कमी करण्याची मागणी होत आहे.

जीएसटी कौन्सिल ऑनलाइन गेमिंगवर जीएसटी लावत असल्याबाबत ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे उद्योगाचे मत आहे. महसूल विभाग, वित्त मंत्रालयाच्या कर संशोधन युनिट (टीआरयु) ने एकूण स्पर्धा प्रवेश रकमेच्या 28 ते 30 टक्के शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT