मडगाव अर्बनकडून 10 हजार ठेवीदारांच्या ठेवी हस्तांतरित

दावा न केलेल्या लॉकरमधील सामान मुख्य शाखेत हलवलं
Madgaon Urban Bank
Madgaon Urban BankDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मडगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेने ठेवीदारांच्या ठेवी हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास 10 हजार ठेवीदांरांना त्यांच्या ठेवी परत देण्यात आल्या असून फोंडा आणि मडगावमधील शाखांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ज्या ठेवीदारांचे बँकेत लॉकर आहेत आणि त्यावर अद्यापही दावा करण्यात आलेला नाही, असा सर्व मुद्देमाल बँकेच्या मुख्य शाखेत स्थलांतरित करण्यात आला आहे.

Madgaon Urban Bank
गोव्यात पिंक पोलिस फोर्स महिलांसाठी असुरक्षित?

मडगाव अर्बन सहकारी बँकेच्या राज्यभरातील सर्व शाखा 1 एप्रिलपासून बंद करण्यात आल्या आहेत. यासोबतच बँकेच्या सर्व 58 कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. बँकेच्या बंद झालेल्या शाखांमध्ये मडगाव, सांगे, मडगाव ओल्ड मार्केट, कुडतरी, बाणावली, पणजी, सांत आंद्रे, आके आणि फोंडा या शाखांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने 27 जुलै 2021 रोजी मडगाव अर्बन बँकेवर निर्बंध लादत बँकेचा परवानाही रद्द केला होता. तसंच रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार सहकारी संस्थांच्या निबंधकांकडून एस व्ही नाईक यांची लिक्विडेटर म्हणून बँकेचं कामकाज थांबवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. फेब्रुवारी-मार्च महिन्यात बँकेने 250 लॉकरधारकांना नोटीस बजावली होती. आपल्या लॉकरमधील ऐवज सोडवण्याची सूचना बँकेने या नोटीसमधून केली होती. ज्यांना आपली लॉकर सोडवून घेता येणार नाहीत, त्यांचे लॉकर बँक स्वत:हून उघडणार असल्याचंही नोटिशीत सांगण्यात आलं होतं.

Madgaon Urban Bank
वीज वाहिनीच्या दुरुस्तीवेळी झटका बसून कर्मचाऱ्याचा मृत्यू

बँकेने याआधी जारी केलेल्या नोटीसमध्ये सप्टेंबरअखेरपर्यंत लॉकर खाली करुन आपलं सामान सोडवण्याच्या सूचना ग्राहकांना केल्या होत्या. ज्या लॉकरधारकांनी आपले लॉकर सोडवले नव्हते त्यांना बँकेकडून पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली होती. मडगाव आणि फोंडा शाखेतील ठेवीधारकांच्या ठेवी देण्यात आल्याची माहिती मडगाव अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक किशोर आमोणकर यांनी दिली आहे.

जवळपास 700 ठेवीदारांनी फोंडा शाखेत तर 2000 ठेवीदारांनी मडगाव शाखेतून आपल्या ठेवी काढून घेतल्या आहेत. तर सुमारे 900 ठेवीदारांना सांगे शाखेतून त्यांच्या ठेवी येत्या काही दिवसांमध्ये दिल्या जाणार असल्याची माहिती आमोणकर यांनी दिली. बऱ्याच खातेदारांनी आपले लॉकर्स अजूनही खाली केले नाहीत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात हे सर्व लॉकर्स मुख्य शाखेत हलवण्यात आले असून जर खातेदाराने दावा न केल्यास बँक ते स्वत:हून उघडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच विमा कव्हरप्रमाणे 5 लाखांपर्यंतची रक्कम बँक देणार असून त्यावरील रक्कम ही लिक्विडेटरकडून दिली जाणार आहे. तब्बल 120 कोटी रुपयांच्या ठेवी ग्राहकांना द्यायच्या असून 56 हजार ठेवीदारांपैकी 10 हजार ठेवीदारांनी आपल्या ठेवी क्लेम केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com