Vasco: वास्को बेलाबाय - चिरकून ऊडी येथील 'गोवा क्रिडा प्राधिकरण' (साग) च्या खुल्या जागेत भंगार कचरा टाकण्यात आला आहे. कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मुरगाव नगरपालिकेने सागच्या जागेत कचरा टाकण्यात येत असल्याची निवेदनाव्दारे माहीती प्राधिकरणाला दिली, मात्र सागने कोणतीच कारवाई केली नसल्याने पालिकेने नाराजी व्यक्त केली आहे.
वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी आज (दि.23) तान्या हॉटेलसमोरील मोकळ्या जागेची क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकार्यांसह संयुक्त पाहणी केली.
'लोकांनी कचरा टाकू नये म्हणून जागेवर ताबडतोब कुंपण उभारले जाईल तसेच इनडोअर आणि आउटडोअर क्रीडा संकुलाचा आराखडा महिनाभरात तयार होईल.' असे आमदार साळकर यांनी यावेळी सांगितले.
सागच्या खुल्या जागेत वाढत असलेल्या भंगार कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली.
वास्को टिळक मैदानावर फुटबॉल सामने पाहण्यासाठी येणाऱ्यांची वाहने पार्किंगसाठी रिक्त ठेवली असून, येथे आता कचारा टाकण्यात येत आहे.
संपूर्ण जागेत भंगार कचरा व बेकायदेशीर भंगार वाहने पार्किंग बरोबर दक्षिण पश्चिम रेल्व तर्फे अतिक्रमण केले आहे. सागच्या जागेत वाढत असलेल्या भंगार कचऱ्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वाढत्या दुर्गंधीमुळे बेलाबाय - चिरकून ऊडी, मायमोळे, ओरुले व इतर भागात रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याविषयी 'गोमन्तक'मध्ये बातमी झळकली होती. वास्कोत साजरा होणारा दामोदर सप्ताह काळात येणाऱ्या भाविकांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था, बेलाबाय - चिरकून ऊडी येथील सागच्या खुल्या जागेत करीत आलेले आहे. परंतु सद्या या जागेत भंगार कचरा टाकल्याने सप्ताहाच्या काळात वाहन पार्किंगचा प्रश्न वाहतूक पोलिसासमोर उभा राहिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.