'CM करोडोंची उढळपट्टी बंद करा', असे सांगण्याचे धाडस ढवळीकर करणार का? 'वीजमंत्री संधिसाधू' काँग्रेसची खोचक टीका

सदोष जूने इन्सुलेटर आणि कंडक्टरमुळे गोव्यात वारंवार वीज प्रवाह खंडित होत आहे. असे विधान ढवळीकर यांनी केले होते.
Amarnath Panjikar
Amarnath PanjikarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यक्रमांवर करोडो रुपयांची उढळपट्टी बंद करावी, आणि तो निधी वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी इन्सुलेटर आणि कंडक्टर खरेदी करण्यासाठी वापरावा. असे वीजमंत्री ​​सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांना सांगण्याचे धाडस करावे अथवा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली.

सदोष जूने इन्सुलेटर आणि कंडक्टरमुळे गोव्यात वारंवार वीज प्रवाह खंडित होत आहे. असे विधान ढवळीकर यांनी केले. विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत अमरनाथ पणजीकर यांनी वीज खात्याने भाजपच्या गेल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत करोडो रुपये कसे खर्च केले यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.

'काही दिवसांपूर्वी वीज खात्याच्या पूर्ण निष्काळजीपणामुळे पर्वरी येथे एका गायीला विजेचा धक्का बसला होता, तेव्हा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपली अकार्यक्षमता व निष्पाप गोमातेच्या हत्येचे पाप लपवण्यासाठी ‘इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड’चे स्पष्टीकरण दिले होते.

त्यांच्या तर्कानुसार, पावसाळ्यात पाणी साचल्याने आणि वीज खात्याच्या निष्काळजीपणाने उघड्यावर सोडलेल्या विजेच्या तारांनी जनावरांना धक्का लागून त्यांचा मृत्यू होऊ शकतो हे स्पष्ट झाले आहे. विजेचा झटका लागू नये म्हणून सरकारने आता जनावरांना गमबूट दिले पाहिजेत,' असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला.

Amarnath Panjikar
सोळा खून, बायकोच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या दुपट्टा किलर महानंद नाईकच्या फॅमिलीचे पुढे काय झाले?

'2012 मध्ये सत्तेत आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने जवळपास 500 कोटी रुपये कार्यक्रम आणि जाहिरांतीवर खर्च केले आहेत. गेल्या 10 वर्षात सर्वाधिक वेळ भ्रष्ट, असंवेदनशील, बेजबाबदार भाजप सरकारसोबत वीजमंत्र्यांनी सत्ता उपभोगली. सुदिन ढवळीकर आता आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी मगरीचे अश्रू ढाळत आहे,' असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.

भाजप सरकार गेल्या दहा वर्षांत इन्सुलेटर आणि कंडक्टर बदलण्यात का अपयशी ठरले? गोव्यात भूमिगत वीज वाहिन्यांचा विस्तार करण्यात भाजप सरकार का अपयशी ठरले? सौरउर्जा व अक्षय उर्जा निर्माण करण्यात भाजप सरकार का अपयशी ठरले? याचे उत्तर ढवळीकरांनी जनतेला द्यावे अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. गोव्यातील घरांना अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. असा टोमणा अमरनाथ पणजीकर यांनी मारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com