Ganesh Chaturthi 2023 Festival In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: म्हापसा गणेशोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Chaturthi 2023: येथील नगरपालिका बाजारात सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचा गणेशोत्सव विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनिशी सुरू झाला आहे. गुरुवार, ता. २१ रोजी, सकाळी पूजा, आरती, सायं. ६ वा. निषाद क्रिएशन निर्मित ‘आला गं सुगंध मातीचा’ मराठी गीत गायनाचा कार्यक्रम होईल. यात गायक नवाज शेख, अक्षता रामनाथकर, मुक्ता मिसर (जळगांव) सहभागी होतील.

नितीन कोरगांवकर (तबला), महेंद्र मांद्रेकर (सिंथेसायझर), शिवानंद दाभोळकर (संवादिनी), अश्विक जाधव (ऑक्टोपॅड) हे साथसंगत करतील. निवेदन पल्लवी देसाई यांचे असेल.

२३ रोजी, धार्मिक विधी, आरती, सायं. ६ वा. नेहा उपाध्ये हिचे कीर्तन होईल. शेखर नागडे (संवादिनी) व गोरखनाथ मांद्रेकर (तबला) साथसंगत करतील. २४ रोजी पूजा, आरती, सायं. ५ वा. म्हापसा शहरातील दहावी-बारावी व पदवी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येईल. या सोहळ्यास मांद्रे कॉलेजचे प्राचार्य तुषार अणवेकर उपस्थित असतील. सायं. ६ वा. जान्हवी बोंद्रे यांच्या सिद्धकला डान्स अकादमीच्या मुलांतर्फे नृत्याविष्कार, रात्री १० वा. हेरंब मुंबई निर्मित लोकनृत्यविष्कार ‘सुपरहिट जल्लोष एक धमाका’ सादर होईल.

२६ रोजी सकाळी पूजा, आरती, सायं. ५ वा. शालेय गीत गायन स्पर्धा, रात्री १० वा. ‘बायांनो नवरे सांभाळा’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. २७ रोजी,१० वा. सिद्धिविनायक महापूजा, १२ वा. महाआरती, तीर्थप्रसाद, त्यानंतर म्हापसा व्यापारी संघटनेतर्फे दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद,

सायं. ५ वा. शशिकला गोवेकर व साथी कलाकारांचे भजन, रात्री १० वा. स्वरनिनाद निर्मित ‘सत्यम शिवम सुंदरम’ गीतांचा कार्यक्रम होईल. २८ रोजी पूजा, आरती, दुपारी ३ वा. उत्तरपूजा, महाआरती, सायं.४ ते ५ पर्यंत पावणी, देणगी कुपन निकाल, नंतर बेळगाव बॅण्ड सह विसर्जन मिरवणूक निघेल.

25 रोजी कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, नाटक

25 रोजी पूजा, आरती, सायं. ५ वा. शालेय पातळीवरील कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा, रात्री १० वा. अर्चना थिएटर्स मुंबई निर्मित नाटक ‘प्रेम करावं पण जपून’ होईल. यात संकेत शेटगे, मृदुल कुलकर्णी, भक्ती तारलेकर, विशाल असगणकर यांच्या भूमिका आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT