Goa Ganesh Chaturthi 2023: अखेर बाप्पांचेही खड्ड्यांतूनच धक्के खात घरोघरी आगमन

मोरजीत रस्त्यांवर पाणीच पाणी; सार्वजनिक बांधकाम खात्याचा हलगर्जीपणा
Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chaturthi 2023Dainik Gomantak

Goa Ganesh Chaturthi 2023: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाच्या हलगर्जीपणामुळे यंदा गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला आणि चतुर्थीदिवशीही गणपती बाप्पाला रस्त्यांवरील खड्ड्यांचा सामना करत, धक्के खात गणेशभक्तांच्या घरी यावे लागले. यावरून सार्वजनिक बांधकाम खाते आणि मंत्रीही निष्क्रिय आहेत, हे दिसून येते.

Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chturthi 2023: जनतेच्‍या कल्याणासाठी शक्ती दे!

पेडणे तालुक्यातील गावागावांतील रस्त्यांवर नजर मारली तर सर्वत्र दयनीय अवस्था दिसून येते. रस्त्यांची अशी स्थिती होण्यामागे वीज खाते असून त्यांना पूर्ण पाठिंबा साबांखाचा होता.

मोरजी पंचायत क्षेत्रातील चांगले रस्ते खणून ते धोकादायक स्थितीत ठेवण्याचे काम वीज खात्याने केले आणि हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाच्या आशीर्वादाने चालू होते. राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार वारंवार सुरू आहे. आता गणेश चतुर्थीच्या उत्सवात देखील लोकांना व्यवस्थित रस्ते मिळाले नाहीत.

रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना सार्वजनिक बांधकाम खात्याने केल्या नाहीत. रस्त्याच्या बाजूलाच बांधकामे केल्यामुळे गटार व्यवस्था अस्तित्वातच नाही. ज्यांच्या जमिनी रस्त्याच्या बाजूला आहे, त्यांनी रस्त्याला लागूनच बांधकामे केली आहेत. भविष्यात त्यांच्या दुकाने, घरे, इमारतीकडे येणारे लोक वाहने कुठे उभी करणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Goa Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023: पंधरा दिवस अगोदरच चतुर्थीच्‍या तयारीला लागतो, सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई

गटारे गायब

मोरजी पंचायत क्षेत्रातील नारोजीवाडा, मधलावाडा, गावडेवाडा येथील रस्त्यांवर साचलेले पाणी, गटार व्यवस्था गायब, अतिक्रमण करून केलेली बांधकामे, रस्त्यावर पार्क केलेली वाहने, अशा अनेक अडचणींवर मात करत गणेशालाही खड्ड्यांतून धक्के खात यावे लागले.

वीज खात्यामुळे नाहक त्रास

वीज खात्याने भूमिगत वाहिन्या घालताना ज्या पद्धतीने रस्ते खणले होते, ते व्यवस्थित बुजवण्याची जबाबदारी रस्ता विभागाची असतानाही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. वारंवार वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध होऊनही गाढ झोपी गेलेल्या सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांनाही जाग आली नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com