CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Jobs in Goa : नोकरी हवी तर मंत्री किंवा आमदाराची भेट नको, आता एकच पर्याय; मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

गोव्यात यापुढे सर्व सरकारी नियुक्त्या स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant on Jobs in Goa : गोव्यात नोकरी मिळवायची असेल तर एक चुकीचा समज आहे, की आपला आमदार किंवा मंत्री नोकरी मिळवून देईल. मात्र यापुढे गोव्यात असं काहीही होणार नाही. त्यामुळे नोकरीसाठी आमदार किंवा मंत्र्यांच्या भेटी घेणं बंद करा असा सल्ला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. गोव्यात यापुढे सर्व सरकारी पदं ही स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत भरली जातील त्यामुळे ज्यांना नोकरी हवी असेल त्यांनी या आयोगामार्फतच अर्ज करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

राज्य सरकारच्या रोजगार आणि कामगार मंत्रालयातर्फे जाहीर केलेल्या मेगा जॉब फेअरमध्ये 15 हजार जणांनी नोंदणी केली आहे. 155 कंपन्यांतील जवळपास 5 हजार जागांसाठी आज मंगळवारी आणि 9 रोजी बुधवारी एकूण 4 स्लॉटमध्ये ही भरती प्रक्रिया होईल, अशी माहिती रोजगार आणि कामगार आयुक्त राजू गावस यांनी दिली आहे.

बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी एका छताखाली ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर 155 कंपन्यांना एकत्र बोलवून ही भरती प्रक्रिया होणार आहे. संख्या जास्त असल्याने गैरसोय टाळण्यासाठी ही नोकरभरती प्रक्रियेचा एक दिवस वाढवला आहे.

दीड लाख बेरोजगार

पंधरा लाख लोकसंख्या असणाऱ्या आपल्या राज्यात 1 लाख 40 हजार बेरोजगार तरुणांनी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज केंद्राकडे नोंदणी केली आहे, अशी माहिती रोजगार आयुक्त गावस यांनी दिली. ही संख्या राज्य सरकार समोरच आव्हान आहे. सध्याची परिस्थिती पाहता तरुणांना नोकरीसाठी अन्य पर्याय शोधावे लागतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT