गोव्यात महिलांसाठी Skill Development Training; सक्षमीकरणासाठी महत्त्वाच पाऊल

कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत
Skill Development
Skill Development Dainik Gomantak

सामान्य कामगारापासून ते कौशल्य आत्मसात करण्याची इच्छा असणाऱ्या युवतींपर्यंत सर्वांना योग्य कौशल्य आत्मसात करता यावे यासाठी गोवा सरकारच्या कौशल्य विकास अधिविभागाने आज प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. हा कार्यक्रम सांखळी येथील रवींद्र भवन येथे पार पडला.

(Goa government Launch of Skill Development Training Programme for Women)

Skill Development
Goa Mega Job Fair: गोवा सरकारने मेगा जॉब फेअरबाबत घेतला मोठा निर्णय

प्रशिक्षण कार्यक्रम उद्धाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हजेरी लावत कौशल्य प्रशिक्षण युवतींचे भविष्य बदलणारे आहे. या कौशल्यामूळे सहभागी युवती स्वत: उद्योग अथवा व्यवसाय सुरु करु शकतील. असे स्पष्ट करत उपस्थित युवतींना मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणासाठी गोवा राज्यातील 10 वी, 12 वी पास तसेच पदवी प्राप्त युवती पात्र ठरणार आहेत. गोवा सरकारचा कौशल्य विकास विभाग हे अभ्यासक्रम आयोजित करत असतो. याद्वारे तरुणांना स्वयंरोजगार किंवा उद्योगांमध्ये रोजगारासाठी सक्षम बनवण्यासाठी अनेक अभ्यासक्रम आयोजित केले जातात. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील युवतींसाठीही कौशल्य प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.

Skill Development
Vijai Sardesai : ...म्हणून मुख्यमंत्री सावंतांना 'मोपा'च्या उद्घाटनाची घाई; विजय सरदेसाईंचा थेट निशाणा

महिलांना नोकरी शोधण्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासासह स्वतंत्र होण्यासाठी जागरूक करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असून या प्रशिक्षणामध्ये एक महिना ते एक वर्षापर्यंतच्या कालावधीचा अभ्यासक्रम असणार आहे.

कौशल्य प्रशिक्षण घेतल्यास त्याचे प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. हे प्रमाणपत्र नोकऱ्या शोधताना अथवा आपला उद्योग उभा करताना उपयोगी पडणार आहे. तसेच कौशल्यात वाढण्यास ही प्रशिक्षण उपयोगी पडणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष व मयेचे आमदार श्री प्रेमेंद्र शेट, इन्फोटेक कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, कौशल्य विकास संचालक दीपक देसाई हे उपस्थितीत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com