Golden Peacock Award 2023 Dainik Gomantak
गोवा

Golden Peacock Award 2023: शरणार्थींच्या व्यथा मांडणाऱ्या ‘एन्डलेस बॉर्डर्स’ला सुवर्ण मयूर

Golden Peacock Award 2023: 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘एन्डलेस बॉर्डर्स’ या चित्रपटाला ‘सुवर्ण मयूर'' बहुमान प्राप्त झाला.

दैनिक गोमन्तक

Golden Peacock Award 2023: 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘एन्डलेस बॉर्डर्स’ या चित्रपटाला ‘सुवर्ण मयूर'' बहुमान प्राप्त झाला.

यावर्षी हॉलिवूडचे प्रख्यात अभिनेते, दोन वेळचे ऑस्कर पुरस्कार विजेते आणि दिग्दर्शक मायकल डग्लस यांना ‘सत्यजीत रे जीवन गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘एन्डलेस बॉर्डर्स’ या चित्रपटातील अभिनेता पौरिया रहिमी सॅम हा उत्कृष्ट अभिनेता, तर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘पार्टी ऑफ फूल्स’ची अभिनेत्री मेलानी थियरी यांना (द्वयींना रजत मयूर) मिळाला. विशेष ज्युरी पुरस्काराचा मानकरी ‘कांतारा’ हा मल्याळम चित्रपट ठरला.

डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये मंगळवारी सायंकाळी हा शानदार सोहळा पार पडला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह कलाकारांच्या मांदियाळीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर रंगारंग कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.

‘एन्डलेस बॉर्डर्स’विषयी...

अफगाणिस्तानात तालिबानच्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर इराणी शिक्षकाचे कठीण जीवन दिग्दर्शक अब्बास अमिनी यांनी भावपूर्णरित्या या चित्रपटात मांडले आहे.

हा शिक्षक शरणार्थींना सीमा पार करण्यासाठी मदत करतो. हा चित्रपट पूर्वग्रह, नैतिक दुविधा आणि निषिद्ध प्रेमातील गुंतागुंत यातले नाट्य अत्यंत सूक्ष्मतेने दर्शवतो.

असे आहेत पुरस्कार

  1. ‘बेस्ट ओटीटी वेब सिरीज : ‘पंचायत सिझन-२’

  2. आयसीएफटी युनेस्को गांधी मेडल : ‘ड्रिफ्ट'' सिनेमा

  3. बेस्ट डेब्यु फिचर फिल्म : ‘व्हेन द सीडलिंग्ज ग्रो’

  4. बेस्ट डायरेक्टर : स्टिफन कोमान्ड्रेव्ह

‘इंडियामें मै आपसे बहुत प्यार करता हूँ! ’अभिनेता आयुष्मानने डग्लस यांना हिंदी भाषेत ‘इंडियामें मै आपसे बहुत प्यार करता हूॅं’ असे वाक्य बोलायला सांगितले. पहिले तीन शब्द त्यांनी पहिल्याच प्रयत्नात उच्चारले; परंतु उर्वरित तीन शब्द पुन्हा बोलावे लागले.

  • डग्लस ‘सत्यजीत रे

  • जीवन गौरव''ने सन्मानित

  • पौरिया रहिमी सॅम सर्वोत्कृष्ट अभिनेता

  • मेलानी थियरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT