Goan Farm brand Keri Sattari Dainik Gomantak
गोवा

केरी-सत्तरीतून उभा राहिला 'गोवन फार्म'चा ब्रँड, युवा कृषी उद्योजकाची यशोगाथा; रासायनिक प्रक्रियाविरहित आंब्यांना मागणी

Goan Farm brand Keri Sattari: केरी-सत्तरीच्या हिरव्यागार कृषी पट्ट्यातील युवा आणि गतिमान कृषी उद्योजक सागर तुकाराम माजिक सध्या आपल्या अभिनव उपक्रमामुळे चर्चेत आले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पर्ये: केरी-सत्तरीच्या हिरव्यागार कृषी पट्ट्यातील युवा आणि गतिमान कृषी उद्योजक सागर तुकाराम माजिक सध्या आपल्या अभिनव उपक्रमामुळे चर्चेत आले आहेत. कृषी पदव्युत्तर शिक्षण आणि प्रत्यक्ष शेतीचा भक्कम अनुभव यांच्या जोरावर त्यांनी गेल्या पाच वर्षांत शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट दुवा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य उभारले आहे.

सागर यांनी गोवा आणि परिसरातील शेतकऱ्यांचे मजबूत जाळे तयार करत ‘गोवन फार्म’ या ब्रँडअंतर्गत विश्वास, पारदर्शकता आणि ताजेपणावर आधारित ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या स्वतःच्या आंबा बागांमध्ये मानकुराद व हापूस (आल्फोन्सो) यांसारख्या दर्जेदार जातींची लागवड केली जाते. त्याचबरोबर इतर बागायतदारांशी सहकार्य करून उत्कृष्ट दर्जाचे आंबे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात.

गेल्या दोन वर्षांत त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करत पुणे आणि बंगळुरू येथेही गोवा व वेंगुर्ला येथील नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे पुरवण्यास सुरवात केली आहे. ग्राहकांना रासायनिक प्रक्रियाविरहित, सुरक्षित आणि निवडक आंबे मिळावेत यासाठी ते विशेष काळजी घेतात.

गेल्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी

गेल्या वर्षी सागर माजिक यांनी मानकुराद आणि हापूस अशा सुमारे १०० डझन आंब्यांची विक्री केली. त्यांच्या स्वतःच्या सुमारे ५० आंब्याच्या झाडांबरोबरच परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही त्यांनी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली होती.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होत असून पारंपरिक शेतीला आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याचे प्रभावी काम घडत आहे. सुरक्षित, दर्जेदार आणि स्थानिक उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता ‘गोअन फार्म’सारखे उपक्रम कृषी क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT