Goa Voter List: मतदार कपातीत गोवा सातव्या क्रमांकावर, 10.02 टक्‍के मतदारांना वगळले

10 percent reduction in Goa voter list: देशातील मतदारयादी सुधारणा मोहिमेचा भाग म्हणून राबवण्यात आलेल्या विशेष सखोल सुधारणा (एसआयआर) प्रक्रियेचा दुसरा टप्पा ज्या १२ राज्यांमध्ये पार पडला.
Goa Voter List
Goa Voter ListDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशातील मतदारयादी सुधारणा मोहिमेचा भाग म्हणून राबवण्यात आलेल्या विशेष सखोल सुधारणा (एसआयआर) प्रक्रियेचा दुसरा टप्पा ज्या १२ राज्यांमध्ये पार पडला, त्यात गोव्‍यातील १०.०२ टक्के मतदारांची कपात झाली. या यादीत गोव्‍याचा बारा राज्‍यांमध्‍ये सातवा क्रमांक लागला आहे.

मतदारयादीची अचूकता सुधारण्यासाठी आणि अपात्र नोंदी वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात एसआयआर प्रक्रिया राबवण्‍याचा निर्णय घेतला.

या मोहिमेअंतर्गत १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातून ५.२ कोटींहून अधिक जणांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली. या राज्यांमध्ये अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये नावे वगळण्याचे प्रमाण सर्वाधिक (१६.६ टक्के) नोंदवले गेले.

Goa Voter List
Goa Drug Peddling: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर उघडपणे होतेय ड्रग्‍सविक्री, परदेशी पर्यटकाने पोलखोल केल्याने खळबळ

१०,५७,५६६ मतदार

गोव्‍या‍तील एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत मतदारांची एकूण संख्या १० लाख ५७ हजार ५६६ इतकी झाली आहे. यापूर्वीच्या यादीत ही संख्या ११ लाख ८५ हजार ०३४ इतकी होती. राज्यात एकूण १ लाख ३९ हजार ६३४ नावे वगळण्यात आल्याची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com