Goa ZP Election Dainik Gomantak
गोवा

ZP Election: डिचोलीत 'झेडपी' उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे केले वाटप, 15 उमेदवार रिंगणात; पाळीत भाजप-काँग्रेसमध्ये लढत

Goa ZP Election: डमी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने डिचोलीत चार मतदारसंघांत मिळून १५ उमेदवार जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत डमी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने डिचोलीत चार मतदारसंघांत मिळून १५ उमेदवार जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.

दरम्यान, निवडणुकीतील उमेदवारांना निर्वाचन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.११) निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

कारापूर-सर्वणमधून सर्वाधिक ५ तर मये आणि लाटंबार्सेमधून प्रत्येकी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तालुक्यातील चारपैकी पाळी या एकाच मतदारसंघात काँग्रेसतर्फे एकमेव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे ‘पाळी’मधून भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या मिळून दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे.

उमेदवार आणि निवडणूक चिन्ह

कारापूर-सर्वण मतदारसंघ : महेश सावंत (भाजप-कमळ), स्वप्नील फडते (गोवा फॉरवर्ड-नारळ), राज गावकर (आप-झाडू), ॲड. अजय प्रभुगावकर (अपक्ष-विमान) आणि अनिल नाईक (अपक्ष-कपाट).

मये मतदारसंघ : कुंदा मांद्रेकर (भाजप-कमळ), प्रा. राधिका कळंगुटकर (गोवा फॉरवर्ड-नारळ), पर्पेट डिसोझा (आप-झाडू), राधिका कोरगावकर (अपक्ष-विमान).

लाटंबार्से मतदारसंघ : पद्माकर मळीक (भाजप-कमळ), मेघ:श्याम राऊत (अपक्ष-कपाट), छाया नाईक (आप-झाडू), कृष्णराव बाबासाहेब राणे (अपक्ष-विमान).

पाळी मतदारसंघ:सुंदर नाईक (भाजप-कमळ), भानुदास सोननाईक (काँग्रेस-हात).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीची तारीख अखेर जाहीर! प्रचाराची रणधुमाळी वाढण्याची चिन्हे; 4 मे रोजी होणार मतमोजणी

Horoscope: 'या' राशींना होणार धनप्राप्ती! ग्रह देताहेत शुभसंकेत; कुणाला होणार फायदा? वाचा राशिभविष्य

LPG Gas Cylnder: गोव्यात भीतीमुळे गॅसचे झपाट्याने 'बुकिंग'! एका दिवसात तब्बल 'इतक्या' सिलिंडरचे वितरण; किती साठा आहे शिल्लक? वाचा..

Dhurandhar 2: "यासाठी धुरंधरमधला रोल सोडला"! प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा; बॉलिवूडमध्ये रंगली जोरदार चर्चा

Kanagi: ‘गोंयकार’ गृहिणी तव्यावर लोणी सोडून मग डोळे बंद करून भाजीच्या टोपलीत हात घालतात; 'कणगी'महात्म्य

SCROLL FOR NEXT