

पणजी: राज्यात घरगुती वापरासाठी दररोज ११ हजार सिलिंडर वितरित करावे लागतात. गॅस टंचाईच्या चर्चेमुळे आणि भीतीमुळे झपाट्याने बुकिंग केले जात आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभरात १५,५४९ सिलिंडर वितरित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात वाणिज्यिक वापराचे ४२१ सिलिंडर वितरित झाले. राज्यातील गॅस साठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे सरकारचे म्हणणे असले, तरी वाणिज्यिक वापरासाठी गॅसचा पुरवठा सुरूच ठेवल्यास घरगुती गॅस उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
राज्यात दोन ठिकाणी गॅस सिलिंडरमध्ये भरण्याची सोय आहे. त्यावर सरकारने आता लक्ष ठेवले आहे. यासंदर्भात नागरी पुरवठा खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील गॅस साठ्याची स्थिती लक्षात घेतल्यास घरगुती व वाणिज्यिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सध्या समाधानकारक आहे. राज्यात एकूण ५५ वितरक कार्यरत असून त्यापैकी ३३ वितरक हिंदुस्तान पेट्रोलियमचे, १७ भारत पेट्रोलियमचे आणि ५ इंडियन ऑइल कंपनीचे आहेत. यापैकी इंडियन ऑइलचा एक वितरक लष्करासाठी असून त्यांचे सिलिंडर पूर्णपणे लष्करी वापरासाठी राखीव आहेत.
वाणिज्यिक वापरासाठी १९ किलो वजनाचा सिलिंडर असतो. आज राज्यात २,२८८ सिलिंडर उपलब्ध होते. दिवसभरात ८१९ सिलिंडर भरण्यात आले. त्यामुळे साठा ३,१०७ सिलिंडर इतका झाला. यापैकी दिवसभरात ४२१ सिलिंडर वितरित करण्यात आले. त्यामुळे दिवसअखेर २,६८७ सिलिंडर शिल्लक राहिले.
घरगुती वापरासाठी १४.२ किलो वजनाचा सिलिंडर असतो. राज्यात सकाळी २५,१८३ सिलिंडर उपलब्ध होते. दिवसभरात १५,७५३ सिलिंडर भरण्यात आले. त्यामुळे ४०,९३६ सिलिंडर उपलब्ध झाले. दिवसभरात १५,५४९ सिलिंडर ग्राहकांना वितरित करण्यात आले. दिवसअखेर २५,३८८ सिलिंडर शिल्लक राहिले.
राज्यातील गॅस साठ्याच्या आकडेवारीवरून एक महत्त्वाची बाब समोर येते. जर तात्पुरत्या स्वरूपात वाणिज्यिक (व्यावसायिक) गॅस सिलिंडरचे वितरण थांबवले, तर घरगुती गॅसचा साठा अधिक काळ टिकू शकतो. राज्यात २,६८७ वाणिज्यिक सिलिंडर आहेत. सध्या दररोज सुमारे ४२१ सिलिंडर वितरित केले जात आहेत.
जर हा पुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला, तर दररोज खर्च होणारा हा गॅस साठ्यात राहील. त्यामुळे हा साठा घरगुती गरजांसाठी वळवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यातून ५६० घरगुती वापराचे सिलिंडर भरता येतील. त्यामुळे अर्ध्या दिवसाची घरगुती गॅसची गरज यातून भागवता येईल.
इंडियन ऑइलकडे वाणिज्यिक वापराचे ४० सिलिंडर होते. २१६ भरल्यानंतर २५६ उपलब्ध झाले. त्यापैकी ४० वितरित झाल्याने २१६ शिल्लक राहिले. घरगुती वापरासाठी ९८६ सिलिंडर होते. ७२० भरल्यानंतर १,७०६ उपलब्ध झाले. त्यापैकी ४९८ वितरित झाल्याने १,२०८ सिलिंडर शिल्लक राहिले. साठा ३.४५ दिवसांचा आहे.
भारत पेट्रोलियमकडे वाणिज्यिक वापराचे २,०३८ सिलिंडर होते. २५६ भरल्यानंतर साठा २,२९४ झाला. त्यापैकी ३३ वितरित झाल्याने २,२६० शिल्लक राहिले. घरगुती वापरासाठी १०,२५३ सिलिंडर होते. ४,४७२ भरल्यानंतर १४,७२५ उपलब्ध झाले. त्यापैकी ५,०५१ वितरित झाल्याने ९,६७० सिलिंडर शिल्लक राहिले. साठा २.७९ दिवसांचा आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियमकडे शनिवारी सकाळी वाणिज्यिक वापराचे १,२११ सिलिंडर होते. ३४७ सिलिंडर भरल्यानंतर साठा १,५५८ झाला. त्यापैकी ३४७ वितरित झाल्याने दिवसअखेर १,२११ शिल्लक राहिले. घरगुती वापरासाठी १३,९४४ सिलिंडर होते. १०,५६३ भरल्यानंतर २४,५०७ उपलब्ध झाले. त्यापैकी १० हजार वितरित झाल्याने १४,५०७ सिलिंडर शिल्लक राहिले. साठा सुमारे १.९४ दिवसांचा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.