Election Dainik Gomantak
गोवा

Zilla Panchayat Election: तारीख ठरली! जिल्हा पंचायत निवडणूक होणार 13 डिसेंबर रोजी; लवकरच होणार अधिकृत घोषणा

Goa Zilla Panchayat Election: प्रभाग रचना कशा असतील, त्याविषयीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील मामलेदार आणि तालुका मामलेदारांकडे १६ ते २६ सप्टेंबरपर्यंत खुली ठेवण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तपद सध्या रिक्त आहे. ते पद भरल्यानंतर या निवडणुकीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा पंचायतींच्या प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

प्रभाग रचना कशा असतील, त्याविषयीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील मामलेदार आणि तालुका मामलेदारांकडे १६ ते २६ सप्टेंबरपर्यंत खुली ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता आलेल्या सूचना व आक्षेप विचारात घेऊन प्रभाग रचना राज्‍य निवडणूक आयोगाकडून निश्चित केली जाणार आहे.

त्या आधी आयोगाने जिल्हा पंचायत निवडणूक अधिकारी आणि साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीला राज्य निवडणूक आयुक्त पदावरून दौलत हवालदार निवृत्त झाले.

राज्य सरकारकडून मिळाली मान्यता

नवीन आयुक्तांनी सूत्रे स्वीकारल्यावर निवडणूक तारखेविषयीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. १३ डिसेंबरला जिल्हा पंचायत निवडणूक घेण्याच्या आयोगाच्या प्रस्तावाला प्रशासकीय तयारीच्या दृष्टिकोनातून विचार करत राज्य सरकारनेही मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT