Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतींची निवडणूक 13 डिसेंबरला? राज्य सरकार करणार घोषणा; प्रभाग फेररचना होणार पूर्ण

Goa Zilla Panchayat Election: राज्यातील उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसाठी १३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निर्णयावर राज्य सरकारकडून येत्या एक-दोन दिवसांत शिक्कामोर्तब होणार आहे.
Election
ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसाठी १३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निर्णयावर राज्य सरकारकडून येत्या एक-दोन दिवसांत शिक्कामोर्तब होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबरला मतदान घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरातच प्रभाग फेररचनेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोग ही निवडणूक घेणार असला तरी संपूर्ण प्रक्रिया पंचायत संचालनालयातर्फे पार पाडली जाते.

प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे द्यावी यासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र सरकारने प्रभाग फेररचना प्रक्रिया सुरू केल्याचे न्यायालयाला कळवले होते. त्यामुळे प्रभाग रचना करण्याचे काम पंचायत संचालनालयाकडेच राहिले आहे.

जिल्हा पंचायतींचा कार्यकाळ ७ जानेवारी २०२६ रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधीच सरकारला निवडणूक घेणे बंधनकारक आहे. २५ डिसेंबरनंतर नाताळ व नववर्ष स्वागताची धूम राज्यभर सुरू होते.

Election
Curti Zilla Panchayat: 'मगोप-भाजप' एकत्र येणार? ‘कुर्टी’ झेडपी निवडणुकीसाठी नवी समीकरणे

तसेच पर्तगाळी मठाच्या ५५०व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात येतील अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. परिणामी डिसेंबरच्या मध्यावर येणाऱ्या शनिवारी, म्हणजेच १३ डिसेंबर रोजी जिल्हा पंचायतींसाठी मतदान घेण्याची शिफारस सरकारला करण्यात आली आहे. यावर अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल, असे सांगण्यात येते.

Election
Rumdamol Panchayat Election: रुमडामळ पंचायतीची निवडणूक लांबणीवर

निवडणुकीसंदर्भात महत्त्‍वपूर्ण बाबी

1 मतदानाची शिफारस : १३ डिसेंबर २०२५

2 कार्यकाळ समाप्ती : ७ जानेवारी २०२६

3 संपूर्ण प्रक्रिया पंचायत संचालनालय अखत्यारीत

4 २५ डिसेंबरपासून सण-उत्सव कालावधी, त्यामुळे मतदान आधीच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com