Election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप'ने कंबर कसली! 14 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; उत्तरेत 6, दक्षिणेत 8 जण निश्‍चित

Goa ZP Election AAP Candidate: पुढील महिन्यात १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने १४ उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पुढील महिन्यात १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने १४ उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केली. त्‍यात उत्तर गोव्यातील ६ आणि दक्षिण गोव्यातील ८ मतदारसंघांचा समावेश आहे.

‘आप’चे गोवा प्रमुख अमित पालेकर आणि गोवा प्रभारी आतिषी मार्लेना यांच्या मान्यतेने ही यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वांत प्रथम उमेदवार यादी जाहीर करण्यात ‘आप’ आघाडीवर असल्याचे यातून दिसून आले. अजूनही काँग्रेस, भाजप या आघाडीच्या पक्षांकडून उमेदवार जाहीर झालेले नाहीत.

दरम्यान, आमचे उमेदवार हे केवळ स्पर्धक नाहीत, तर त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जाऊन तळागाळात काम करून हजारो नागरिकांना ‘आप’च्या आरोग्य सुविधांचा लाभ दिला आहे. तसेच ते नागरिकांच्या प्रत्येक संघर्षात त्यांच्यासोबत उभे राहिले आहेत. हे सेवाभिमुख राजकारण प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा, असे ‘आप’च्या गोवा प्रभारी आतिषी मार्लेना म्हणाल्या.

भाजपला सडेतोड विरोध देणारे विरोधक म्हणून ‘आप’ने नेहमीच खंबीर भूमिका बजावली आहे. मग ती भ्रष्टाचाराची पोलखोल असो, आरोग्य सुविधांसाठीचा लढा असो किंवा युवक आणि महिलांच्या समस्यांवर उठवलेला आवाज असो. आमचे हे सर्व काम आम्ही लोकांमध्ये घेऊन जाऊ आणि त्यांना ‘आप’ला मतदान करण्याचे आवाहन करू, असे ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.

उमेदवारांची नावे

मोरजी : सुवर्णा हरमलकर, धारगळ : ॲड. प्रसाद शहापूरकर, शिरसई : उमेश कवठणकर, मये- पॅर्पेट मायकल डिमेलो, खोर्ली : पास्कल फर्नांडिस, नगरगाव : अर्जुन गुरव, राय : लुईस ओलिवेरा, वेळ्ळी : इसाका फर्नांडिस, बाणावली : जोसेफ पिमेंता, कोलवा : आंतानियो फर्नांडिस, नावेली : बेट्रिस डिसोझा, सावर्डे : उर्मिला उमेश केरकर, शेल्डे : जेम्स फर्नांडिस, पैंगीण : राजेश गावकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT