Goa ZP Election: 'सध्या लढा आहे तो भाजप विरुद्ध गोवा असा'! LOP युरींचे मत; काँग्रेस, आरजीपी, फॉरवर्ड निवडणूकीसाठी एकत्र

Goa ZP Election: आलेमाव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, की राज्यातील विरोधातील सर्व पक्षांना एकत्रित राहिलो तरच भाजपला पराभूत करू शकतो, हे उमगलेले आहे.
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: येणारी जिल्हा पंचायत निवडणूक काँग्रेस, आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड एकत्र लढतील. या तिन्ही पक्षांची ही युती २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले.

आलेमाव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वरील मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, की राज्यातील विरोधातील सर्व पक्षांना एकत्रित राहिलो तरच भाजपला पराभूत करू शकतो, हे उमगलेले आहे. सध्या जो लढा आहे तो भाजप विरुद्ध गोवा असा दिसतो. गोवा का म्हणत आहे, तर विरोधी पक्षांची महाआघाडी (ग्रँड ऑपोझिशन अलायन्स (जीओए) विरुद्ध भाजप अशी स्थिती आहे.

गोव्यातील जनतेला ‘गोवा‘ तयार झालेला हवा आहे. २०२७ मध्ये भाजप विरुद्ध गोवा अशी लढत असेल, कारण लोकांना वाटते की, गोवा हा केवळ विरोधी पक्षांचा नाही, तर ॲक्टिव्हिस्ट, मच्छिमार, एसटी समाज, महिला, पत्रकार हे सर्व एकत्रित भाजपविरोधात असणार आहेत. २०१२ मध्ये भाजप परिवर्तनाच्या नावाखाली सत्तेत आली आहे. कसले परिवर्तन गोव्यात होत आहे, आम्हाला त्यांच्यामुळे कसले परिवर्तन दिसत आहे.

Yuri Alemao
Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

ते पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांवर, लहान माणसांवर हल्ले होत आहेत. सर्व विरोधी पक्षांना एकत्र असावेत असे वाटते. जेव्हा गोंयकार एकत्र झाले, तेव्हा लोकसभेला दिसून आले. देशातील सर्वात श्रीमंत उमेदवाराविरुद्ध जनता एकत्रित दिसून आले. या सरकारने परिवर्तनाच्या नावाला जी आश्वासने दिली, पण गोंयकारांना त्यांनी केवळ गप्प बसवले आहे. महाआघाडी म्हणजेच सर्व गोंयकार असा अर्थबोध करीत युरी म्हणतात, आम्ही महाआघाडीची लवकरच घोषणा करू, असेही त्यांनी नमूद केले.

Yuri Alemao
Zilla Panchayat Election: तारीख ठरली! जिल्हा पंचायत निवडणूक होणार 13 डिसेंबर रोजी; लवकरच होणार अधिकृत घोषणा

आम आदमी पक्षाला महाआघाडीचे दरवाजे खुले आहेत का, यावर युरी म्हणतात आपची भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी सर्व मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आता काही उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. इतर विरोधी पक्ष म्हणजेच काँग्रेस आरजीपी, गोवा फॉरवर्ड यांची महाआघाडी तयार होईल, असा आपणास पूर्ण विश्वास आहे. परंतु आमची रणनीती काय असेल, हे आपण सांगू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com