Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यात मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

Goa Weather: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता कमी झाल्याचे चित्र आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी गोव्याच्या काही भागांत पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा वेधशाळेने राज्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत केवळ २.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पावसाची सरासरी आकडेवारी किंचित वाढली असली, तरी एकूण पर्जन्यमानात फारसा फरक पडलेला नाही.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम पुढील काही दिवसांत राज्यातील वातावरणावर दिसू शकतो. त्यामुळे अधूनमधून सरी बरसण्याची शक्यता कायम आहे.

दरम्यान, यलो अलर्ट जारी झाल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः खालच्या भागात राहणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती उपाययोजना कराव्यात, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील किनारी भागांतही आकाश ढगाळ राहून, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यामुळे पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांनी प्रवास करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच नियोजन करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT