Water Metro Goa
Goa Water MetroDainik Gomantak

Water Metro Goa: 'वॉटर मेट्रो'साठी पथक गोव्यात दाखल! करणार जलमार्गांचा अभ्यास; मांडवीच्या पात्राची तपासणी

Goa Water Metro: गोवा दौऱ्यावर आलेल्या कोची मेट्रोच्या पथकाने मंगळवारी मांडवी आणि म्हापसा नदीपात्रातून जलमार्ग आणि जेटीच्या ठिकाणांची पाहणी केली.
Published on

पणजी: गोवा दौऱ्यावर आलेल्या कोची मेट्रोच्या पथकाने मंगळवारी मांडवी आणि म्हापसा नदीपात्रातून जलमार्ग आणि जेटीच्या ठिकाणांची पाहणी केली. उद्या हे पथक शापोरा आणि झुआरी नदीतील जलमार्गाची पाहणी करणार आहे.

नदी परिवहन खाते तथा नव्याने नामकरण केलेल्या अंतर्गत जलमार्ग खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले की, मागील महिन्यात खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि मी कोची येथे जाऊन तेथील कोची मेट्रोने सुरू केलेल्या वॉटर मेट्रोची पाहणी केली होती.

केंद्रीय जलमार्ग मंत्री आणि कोची मेट्रोचे व्यवस्थापक यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी गोव्यातील जलमार्गांवर वॉटर मेट्रो सुरू करण्याविषयी कोची मेट्रोचे पथक येऊन पाहणी करेल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार हे पथक आता गोव्यात दाखल झाले आहे.

Water Metro Goa
Goa Water Metro: 'वॉटर मेट्रो' सुरू करण्यासाठी मंत्री फळदेसाई केरळ दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनावाल यांची घेणार भेट

सोमवारी हे पथक गोव्यात दाखल झाले. काल या पथकाने वाहनातून जलमार्गाच्या थांब्यांची पाहणी केली. आज या पथकाने म्हापसा व मांडवी नदीत बोटीतून प्रवास केला आणि बेती, दिवाडी, जुने गोवे, नार्वे, सारमानस, टोल्टो, वाशी, हळदोणा यांसह काही संभाव्य ठिकाणांना भेटी देऊन महसूल निर्मिती मॉडेलवर कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी नवीन जलवाहतूक व्यवस्था प्रस्तावित केली जाऊ शकते का, यावर चाचपणी केल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.

Water Metro Goa
Water Metro Goa: वॉटर मेट्रोमुळे 'पर्यटनाला' मिळणार चालना! मंत्री फळदेसाईंनी व्यक्त केली आशा; कोचीत जलमार्गावर केला प्रवास

आज शापोरा, झुआरी जलमार्गाची पाहणी

बुधवारी हे पथक शापोरा नदी आणि झुआरी नदीतून जलमार्ग व संभाव्य ठिकाणांची पाहणी करणार आहे. हा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर पथकाची नदी परिवहन मंत्री आणि येथील अधिकाऱ्यांबरोबर या पथकाची चर्चा होईल. त्यानंतरच लोकांची मते समजून घेण्यासाठी अभ्यास दौरा सुरू होईल. त्यानंतरच स्वीकारल्या जाणाऱ्या महसूल मॉडेलला अंतिम रूप देण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com