IMD Goa rain warning Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: ..लो मैं आ गया! पुन्हा पावसाची वापसी, विजांसह कोसळणार सरी; 2 दिवस यलो अलर्ट जारी

Goa Rain Update: वेधशाळेच्या माहितीनुसार, बुधवारी प्रामुख्याने उत्तर गोव्यात विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Sameer Panditrao

पणजी : मान्सूनचा कालावधी औपचारिकरीत्या संपल्यानंतर राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र, हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला असून गोवा वेधशाळेने बुधवारी (८ ऑक्टोबर) आणि गुरुवारी (९ ऑक्टोबर) राज्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

वेधशाळेच्या माहितीनुसार, बुधवारी प्रामुख्याने उत्तर गोव्यात विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गुरुवारी संपूर्ण राज्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. समुद्रकिनारी वसलेल्या भागात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पर्यटकांनीदेखील समुद्रकिनाऱ्यावरील क्रियांमध्ये काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट जाणवत असतानाच या पावसामुळे तापमानात थोडीशी घट होण्याची शक्यता आहे. मात्र, अचानक पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊ शकते, तसेच ओलसर हवामानामुळे आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याचीही शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

दरम्यान, हवामानातील या चढउतारांमागे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात आंतरमिटीत पावसाचे प्रमाण कायम राहू शकते, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Atal Setu: अंधार, संशयास्पद हालचाली; अटल सेतूखाली नेमके चालते काय? म्हापसा चोरीतले वाहन सापडल्याने विषय ऐरणीवर..

अग्रलेख: रामा काणकोणकर यांना भररस्त्यात मारहाण, सशस्त्र दरोड्यांचे सत्र; यालाच अराजक म्हणतात

Goa Congress: अमित पाटकरांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष? दिल्लीत गोव्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक

Human Animal Conflict: 'ओंकार हत्ती' पिके नष्ट करण्यासाठीचे आला का? जंगलातील अन्नसाखळी मोडली त्याचे काय?

Goa Theft: ताळगाव झाले आता गणेशपुरी! गुन्हेगारीचा छडा लागेल का? पोलिस दलासमोर दुहेरी आव्हान

SCROLL FOR NEXT