
पणजी: अरबी समुद्राच्या वायव्य आणि ईशान्य भागात घोंघावणारे 'अति तीव्र चक्रीवादळ' शक्ती भारतीय किनारपट्टीपासून पश्चिम-नैऋत्येकडे सरकत असल्यामुळे गोव्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. शुक्रवारी (दि.३) 'गहन दाब' (Deep Depression) मधून विकसित झालेले हे वादळ शनिवार सकाळपर्यंत द्वारकापासून सुमारे ४७० किमी पश्चिमेस आणि कराचीपासून ४२० किमी नैऋत्येस १८ किमी प्रतितास वेगाने केंद्रित झाले होते.
निवृत्त एनआयओ (NIO) मुख्य शास्त्रज्ञ आणि हवामानतज्ज्ञ एम. आर. रमेश कुमार यांनी सांगितले की, "हे वादळ गुजरातेकडे किंवा महाराष्ट्राकडे वळल्यास गोव्यावर याचा परिणाम कमी असेल." 'शक्ती'चा धोका गोव्याला कमी असला तरी महाराष्ट्राला याचा धोका आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
समुद्रातील संभाव्य धोक्यामुळे मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळांच्या निर्मितीची संख्या वाढत असून, गेल्या १५ वर्षांत द्वीपकल्पावरील ७० चक्रीवादळ प्रणालींपैकी २५ अरबी समुद्रातच तयार झाल्या आहेत. 'शक्ती'च्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २७°C पेक्षा जास्त असणे, कमी उभे वाऱ्याचे अपवर्तन (Low Vertical Wind Shear) आणि पुरेसा मध्यम-ट्रोपोस्फेरिक ओलावा (Mid-Tropospheric Moisture) अशा अनुकूल परिस्थिती कारणीभूत ठरल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.