Victory Merchant Trophy Dainik Gomantak
गोवा

Victory Merchant Trophy: हरियाणाविरुद्ध सामन्यात पहिल्याच दिवशी गोव्याच्या मुलांची पिछाडी

Victory Merchant Trophy: सामन्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या पिछाडीवर

किशोर पेटकर

Victory Merchant Trophy गोव्याच्या मुलांनी विजय मर्चंट करंडक 16 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात हरियानाविरुद्ध नांगी टाकली. त्यामुळे तीन दिवसीय सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना मोठी पिछाडी पत्करावी लागली.

सुरत येथील सी. के. पिठावाला स्टेडियमवर सामन्याला शनिवारी सुरवात झाली. नाणेफेक जिंकून गोव्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली, परंतु हा निर्णय त्यांच्यावर उलटला.

त्यांचा पहिला डाव अवघ्या 84 धावांत संपुष्टात आला. सलामीचा स्वप्नेश नाईक (39) व सातव्या क्रमांकावरील द्विज पालयेकर (23) या दोघांचा अपवाद गोव्याच्या बाकी फलंदाजांनी खेळपट्टीवर फक्त हजेरीच लावली.

गोव्याच्या गोलंदाजांना पूर्ण वर्चस्व राखताना हरियानाने पहिल्या दिवसअखेर 2 बाद 209 धावा केल्या. त्यांच्यापाशी आता 125 धावांची आघाडी जमा झाली आहे.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: ३०.५ षटकांत सर्वबाद ८४ (आराध्य गोयल ४, स्वप्नेश नाईक ३९, आशुतोष तेंबकर १, प्रद्युम्न अटपडकर ०, चिगुरुपती व्यंकट ६, साई नाईक ०, द्विज पालयेकर २३, शमिक कामत ०, समर्थ राणे नाबाद ५, जय कांगुरी १, संचित नाईक ०, अंगद मान २०-२, मयांक कटारिया ३०-३, तन्मय बलोडा १८-३).

हरियाना, पहिला डाव: ५९ षटकांत २ बाद २०९ (सक्षम शर्मा ८०, झलक तनेजा ४७, लक्षय नागर नाबाद ५०, करण शोरन नाबाद २७, समर्थ राणे ८-२-२२-०, शमिक कामत ७-१-२४-०, संचित नाईक १३-०-५८-०, द्विज पालयेकर १२-०-३८-०, जय कांगुरी १३-०-३७-१, आराध्य गोयल ६-०-२९-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT