

Jharkhand Accident 13 Dead: झारखंडमधील रामगड जिल्ह्यात रांची-पटना महामार्गावर शनिवारी (28 नोव्हेंबर) मध्यरात्री भीषण अपघात झाला. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एनएच-33 वरील पैंकी परिसरात स्कॉर्पिओची दुसऱ्या वाहनाशी जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत 13 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, गाडीत एकूण 14 जण प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की, गाडीची अवस्था पाहून या घटनेची तीव्रता सहज लक्षात येते.
रामगड पोलिसांनी 13 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला. रामगडचे एसडीपीओ आलोक रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी बिहारमधील (Bihar) नालंदा जिल्ह्याचे रहिवासी होते. त्यांच्याजवळ सापडलेल्या ओळखपत्रांवरुन काही मृतांची ओळख पटवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, नालंदा जिल्ह्यातील जांघारो गावातील 14 जण स्कॉर्पिओमधून रामगड येथील रजरप्पा मंदिरात दर्शनासाठी येत होते. प्रवासादरम्यान पैंकीजवळ त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की, घटनास्थळी मोठा गोंधळ आणि आरडाओरडा झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांमध्ये चार लहान मुले, चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सदर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.