

Daily Horoscope 29 November 2026: रविवारचा (29 नोव्हेंबर 2026) दिवस हा सर्व राशींसाठी आनंदाचा असेल, कामाच्या संधी, नातेसंबंध आणि आर्थिक बाबींबाबत आजचा एकदम खास असणार आहे. प्रत्येक राशीसाठी काही ना काही सकारात्मक किंवा सावध राहण्याचे संकेत आज मिळू शकतात.
मेष आणि वृषभ: मेष राशीच्या लोकांना कामात नव्या संधी मिळू शकतात, पण खर्चावर आवर घालणे गरजेचे राहील. वृषभ राशीसाठी आज कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दिवस असून आर्थिक बाजू भक्कम राहील.
मिथुन आणि कर्क: मिथुन राशीच्या व्यक्तींनी बोलताना संयम राखावा, जुन्या ओळखी कामी येऊ शकतात. कर्क राशीच्या लोकांनी आरोग्याची (Health) काळजी घ्यावी आणि अनावश्यक ताणतणावापासून दूर राहावे.
सिंह आणि कन्या: सिंह राशीसाठी आज आत्मविश्वास वाढवणारा दिवस असून प्रवासाचे योग आहेत. कन्या राशीच्या लोकांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी घरातील किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
तूळ आणि वृश्चिक: तूळ राशीच्या लोकांना जोडीदाराची चांगली साथ मिळेल आणि रखडलेली कामे पुढे सरकतील. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कष्टाचा असला तरी मेहनतीचे योग्य फळ नक्की मिळेल.
धनु आणि मकर: धनु राशीच्या व्यक्तींना धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. मकर राशीच्या लोकांनी घाईगडबड टाळावी; शांत डोक्याने घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील.
कुंभ आणि मीन: कुंभ राशीसाठी नवीन कल्पनांवर काम करण्यास चांगला दिवस असून मित्रांकडून सहकार्य मिळेल. मीन राशीच्या लोकांनी मनातील शंका बाजूला ठेवून सकारात्मक राहावे; संध्याकाळी आनंददायी बातमी मिळू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.