MLA Carlos Ferreira: गोव्याला केंद्राकडून मिळणारा हजार कोटींचा महसूल बुडाला

MLA Carlos Ferreira: या प्रकरणात सहभागी असलेल्या 'त्या' अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक- फेरेरा
MLA Carlos Ferreira
MLA Carlos FerreiraDainik Gomantak
Published on
Updated on

MLA Carlos Ferreira गोवा सरकारने 2017 पासून यावर्षापर्यंत महालेखा परीक्षक प्रमाणपत्र केंद्र सरकारला सादर न केल्याने राज्याला आंतरराज्य जीएसटीचा महसूल मिळत नाही. हा गोवा सरकारकडून ​हलगर्जीपणा असून यामुळे गोव्याला मिळणारे हजारो करोडचा निधी केंद्राकडून मिळालेला नाही अशी माहिती ऍड. कार्लोस फेरेरा यांनी दिलीय.

MLA Carlos Ferreira
Raj Bhavan Goa: खुशखबर! गोवा मुक्ती दिनानिमित्त राजभवन सर्वसामान्यांसाठी खुला

पत्रकार परिषदेत आमदार ऍड. कार्लोस फेरेरा म्हणाले की 2017 पासून ते आत्तापर्यंत केंद्राकडून मिळणारा आयजीएसटी आंतरराज्य जीएसटीचा हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणे बंद झाला असून अशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात कबूली दिल्याचे काँग्रेस आमदार कार्लस फेरेरा यांनी सांगितले.

या प्रकाराविषयी मुख्यमंत्र्यांनी ज्या अधिकारी लोकांनी हलगर्जीपणा करून राज्याला मिळू शकणारा जीएसटीचा महसूल बुडवला आहे त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक असल्याचे फेरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com