IFFI 2026 Golden Peacock Award Winner: स्पेनच्या 'आक्वी'ला सुवर्णमयूर; 'रहमा'ला गांधी पुरस्कार, 'कांतारा'चीही पुरस्कारांवर मोहोर

Aqui Film Portugal France: ‘आक्वी’ हा स्पॅनिश भाषेतील चित्रपट असून त्याची निर्मिती पोर्तुगाल आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे केली आहे.
Aqui Film Portugal France
IFFI 2026 Golden Peacock Award WinnerDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गेल्या नऊ दिवसांपासून पणजीत रंगलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) ५१ लाखांचा सुवर्णमयूर पुरस्कार स्पेनच्या ‘आक्वी’ या चित्रपटाने पटकावला. ‘आक्वी’ हा स्पॅनिश भाषेतील चित्रपट असून त्याची निर्मिती पोर्तुगाल आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे केली आहे. आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कार ‘रहमा’ चित्रपटाला प्राप्त झाला. भारताच्या ‘कांतारा’ चित्रपटालाही महोत्सवात दोन पुरस्कार प्राप्त झाले.

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर सभागृहात शनिवारी सायंकाळी रंगलेल्या महोत्सवात इफ्फीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आनंद एल. राय, ‘एनएफडीसी’चे अध्यक्ष धीरज सिंग आदी उपस्थित होते.

Aqui Film Portugal France
Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या सहकार्याने गोवा सरकार दरवर्षी इफ्फी अधिकाधिक दर्जेदार करीत आहे. इफ्फीच्या माध्यमातून विविध देश भारताशी जोडले जात असून, भारताचे त्यांच्याशी असलेले नाते सांस्कृतिकदृष्ट्या अधिक दृढ होत आहे. इफ्फीच्या निमित्ताने जागतिक पातळीवरील चित्रपट रसिक, समीक्षक, लेखक गोव्यात येत असून, त्यांच्यात विचारांचे आदान-प्रदान होऊन त्याचा फायदा चित्रपट निर्मितीला मिळत आहे. देशभरातील तरुणाई महोत्सवात सहभागी होऊन जगभरातील चित्रपटांचा आस्वाद घेत आहे आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवत आहे.’’

दरम्यान, चित्रपटांचा उद्देश नेहमीच उत्तरे देणे हा नसतो. कधी ते प्रश्न उपस्थित करतात, तर कधी समाजासमोर आरसा धरण्याचे काम करत असतात. चित्रपट महोत्सवांतून प्रेक्षक आपल्यासोबत अशा कथा, आठवणी, मैत्री आणि भावना घेऊन जातात, ज्या आयुष्यभर टिकतात. इफ्फी विविध देशांतील संस्कृती आणि इतिहासांना जोडण्याचे काम करत आहे, असे आशुतोष गोवारीकर यांनी नमूद केले.

मांडले व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रश्न

कुटुंब, मानवी नाती आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रश्न मांडणाऱ्या या चित्रपटाची यंदाच्या इफ्फीमध्ये विशेष दखल घेण्यात आली. दिग्दर्शक टायगो ज्युडीस यांच्या ‘आक्वी’ची मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील १५ चित्रपटांमधून सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड झाली. नोबेल पुरस्कार विजेते लेखक जे. एम. कोएत्झी यांच्या ‘जीझस ट्रिलॉजी’वर आधारित हा चित्रपट एका काल्पनिक, स्मृती पुसून टाकणाऱ्या जगाची कथा मांडतो.

इफ्फीमुळे गोव्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार : मुख्यमंत्री : ५७ व्या इफ्फीत १७ हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली. महोत्सवात एकूण २६१ चित्रपट झळकले आणि १४ ठिकाणी त्यांचे स्क्रीनिंग करण्यात आले. महोत्सवामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक सेवा आणि स्थानिक सेवा पुरवठादारांसाठी व्यवसायाच्या संधी निर्माण होऊन गोव्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागला. गोव्याला चित्रपट निर्मितीचे पसंतीचे ठिकाण बनवण्याचे ध्येय राज्य सरकारने ठेवले आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांसाठी संधी निर्माण होतील’’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Aqui Film Portugal France
Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

पुरस्कार असे...

पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ‘द गोल्डन एज’

सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता : ऋषभ शेट्टी (कांतारा)

विशेष पुरस्कार : कांतारा

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : माया ओरोयुके (द मेल्टडाउन)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : व्होलकर श्लॉन्डॉर्फ (व्हिजिटेशन)

विशेष ज्युरी पुरस्कार : ‘द रिव्हर ट्रेन’

‘ओटीटी’वरील सर्वोत्कृष्ट वेबसीरीज : ‘मेड इन इंडिया : अ टायटन स्टोरी’

इंडियन पॅनोरमात पदार्पण विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : डॉ. विशाल चतुर्वेदी (हनुमान अंश)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.