Afghanistan School Blast: अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतातील शाळेत भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू, सुमारे 100 जखमी

Afghanistan Kunar Province School Blast 6 Dead: अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात शनिवारी (28 नोव्हेंबर) एका शाळेजवळ मोठा स्फोट झाला असून, या दुर्घटनेत सुमारे 6 जणांचा मृत्यू झाला.
Afghanistan Kunar Province School Blast 6 Dead
Afghanistan School BlastDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Afghanistan Kunar Province School Blast 6 Dead: अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात शनिवारी (28 नोव्हेंबर) एका शाळेजवळ मोठा स्फोट झाला असून, या दुर्घटनेत सुमारे 6 जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास 100 लोक जखमी झाले. असदाबादच्या बाहेरील भागात असलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

प्रांताचे संस्कृती आणि माहिती संचालक समी-उल-हक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट सुरुवातीला जवळच्या विस्फोटक साठ्याच्या डेपोमध्ये झाला. मिडिल स्कूललगत (School) असलेल्या एका घरात हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. खाणकामाशी संबंधित लोकांचे हे घर असून, तिथे डायनामाइट साठवून ठेवण्यात आले होते. खाण कंपन्यांच्या विस्फोटक डेपोमध्ये झालेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Afghanistan Kunar Province School Blast 6 Dead
Pakistan Airstrike Afghanistan: गाढ झोपेत असताना काळाचा घाला! पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ला; लहान मुलांसह 22 ठार

स्फोटानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील बहुतांश जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, काहींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेमके काय घडले आणि या स्फोटामागील मुख्य कारण काय होते, याचा तपास यंत्रणांकडून सुरु आहे. मात्र, तपासाबाबत अधिक तपशील किंवा या प्रकरणात कोणाला ताब्यात घेतले आहे की नाही, याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Afghanistan Kunar Province School Blast 6 Dead
Pakistan Airstrikes Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा मोठा हवाई हल्ला! बॉम्बस्फोटांनी हादरलं कंदहार; ड्यूरंड लाईनवर दाटले युद्धाचे ढग VIDEO

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका शाळेच्या आवारातही अशीच धक्कादायक घटना घडली होती. ऑगस्टमध्ये शाळेवर हँडग्रेनेड हल्ला झाल्याची नोंद असून, त्यावेळी 40 पेक्षा अधिक मुले जखमी झाली होती. या पार्श्वभूमीवर शाळा आणि परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.