

Guru Shani Transit December 2026: गुरु आणि शनीच्या गतीमध्ये होणाऱ्या बदलांमुळे वृषभ, तूळ आणि मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. या बदलांमुळे संबंधित राशींच्या धनसंपत्तीत आणि समृद्धीत वाढ होऊ शकते. डिसेंबर महिन्यात या दोन्ही ग्रहांच्या चालीत बदल होणार असून त्याचा थेट परिणाम या तीन राशींवर दिसून येईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता शनी ग्रह मार्गी होणार आहे. शनीची ही सरळ चाल विविध राशींवर परिणाम करेल. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, म्हणजेच 13 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी देवगुरु बृहस्पति वक्री होतील. सध्या गुरु सरळ गतीने मार्गक्रमण करत असून, या उलट्या चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी: नोकरी आणि व्यवसायात वृषभ राशीच्या व्यक्तींना चांगला फायदा मिळू शकतो. नवीन ओळखी आणि संपर्कांमुळे कामात यश मिळेल तसेच उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. मात्र, कोणताही निर्णय घाईघाईत घेणे टाळावे.
तूळ राशी: तूळ राशीच्या लोकांसाठी नोकरीत प्रगतीचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी सुरु असलेला ताण कमी होऊन दिलासा मिळू शकतो. जुन्या वादातून सुटका होण्याची शक्यता असून नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल मानला जातो.
मीन राशी: मीन राशीच्या लोकांची रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. नोकरीत लाभ मिळण्यासोबतच पैशांची बचत करण्यात यश येईल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते, त्यामुळे आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.