Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Unseasonal Rain: राज्यात अवकाळीचे 'धुमशान'; शेतकरी चिंतेत, हातातोंडाशी आलेला घास 'पाण्यात'

एैन कापणीवेळी पावसाचे सावट

गोमन्तक डिजिटल टीम

सपना सामंत

Goa Unseasonal Rain: सत्तरीत सध्या अवकाळी पावसामुळे भात शेती धोक्यात आली आहे. एेन भात कापणीवेळी पावसाचे सावट पसरले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. सविस्तर वृत्त असे कि, यंदा पावसाळा एक महिना उशीरा सुरु झाल्यामुळे शेती कामे उशिरा सुरु झाली होती. त्यानंतर समाधानकारक असा पाऊस पडल्याने शेतीला मुबलक असे पाणी मिळाले होते.

शेत करण्यास एक महिना उशीरा सुरुवात करण्यात आल्यामुळे आता भात सुध्दा उशीरा पिकले. गेल्या आठ दिवसापासुन सत्तरीतील विविध भागात भात कापण्यास सुरुवात झालेली आहे. तर काही ठिकाणी अजुन भात कापणी करायची बाकी आहे.

गेल्या आठवड्यात काही जणांनी भात कापण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी अचानक पाऊस पडायला लागले. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता.

अर्धवट कापलेले भात कापण्याचे काम बंद करण्यात आले होते. कारण जर भात कापले तर ते सुखविणार कुठे हा मोठा प्रश्न होता. तसेच शेतकरी पाऊस संपणारा याची वाट पहात राहीले होते.

कालपासुन पुन्हा शेतकऱ्यांनी भात कापण्यात सुरुवात केली होती आणि आज सकाळी अचानक मुसळधार पाऊस पुन्हा पडू लागल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

अशाच प्रकारे जर पाऊस सुरु राहिला तर भाताची कणसे पावसामुळे नष्ट होण्याची चिंता शेतऱ्यांना सतावत आहे. आता शेतकऱ्यांना पाऊस संपण्याची वाट पहावी लागणार आहे. कामगार घालुन एक दिवसात भात कापणी पुणे होणे अशक्य आहे.

सरकारने वाळपई कृषी कार्यालयात भात कापणीची व्यवस्था करण्याची मागणी

सत्तरीत गेल्या दोन वर्षापासुन पुन्हा अनेक जण शेतीकडे वळू लागले आहे. त्यात आता तंत्रज्ञानाच्या युगात कामगार शेतात काम करणे सुध्दा मुश्किल झाले आहे. त्यातील बार्देश सारख्या भागात अनेक शेतकरी भात कापणी मशीनच्या सहाय्याने कापणी करतात.

मात्र सत्तरीत अश्या प्रकारे मशीन येथे नसल्याने अनेकांची गैर सोय होत आहे. त्यामुळे सरकारने वाळपईत सुध्दा अश्या प्रकारे मशील उपलब्ध करावे जेणे करुन शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचेल अशी मागणी काही शेतऱ्यांनी केली आहे.

शेंगलाचे झाड पडून पाच हजाराचे नुकसान

आज सकाळपासुन सत्तरीतील विविध भागात विजेच्या गडगडासह पाऊस पडत होता. दुपार नंतर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान संध्याकाळी 6 वाजता वाळपई सिटी हाॅल येथे मुविना खान यांच्या घरावर शेंगलाचे झाड पडून पाच हजाराचे नुकसान झाले आहे.

यावेळी वाळपई अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल होऊन मदत कार्य केले व सुमारे 50 हजारांची मालमत्ता वाचविण्यात जवावांना यश आले.

यावेळी अग्निशमनचे श्रीकांत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अदम खान, गंगाराम पावणे, साईनाथ सावंत, आनंद शेटकर, अविनाथ गावकर यांनी मदत कार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

Mohammed Siraj: मिया भाईची 'मायसेल्फ' स्टोरी...! ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद सिराजची प्रतिक्रिया; 'त्या' आठवणीने झाला भावूक VIDEO

SCROLL FOR NEXT